नागरे कुटुंबियाचा मोठेपणा ; जेऊरकुंभारी तलाठी कार्यालयास विनामूल्य जमीन
कोपरगाव प्रतिनिधी –कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी व डाऊच खुर्द या दोन्ही गावांच्या मध्ये सुसज्ज असे तलाठी कार्यालय व्हावे अशी ग्रामस्थांची इच्छा होती, मात्र या जागेसाठी जागेची अडचण ओळखून नागरे कुटूंबीयांनी विनामूल्य जागा देऊन हा प्रश्न सोडवला आहे.
रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष संजय नागरे, आई पार्वतीबाई नागरे व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी शिक्षणमहर्षी स्व.लहानुभाऊ नागरे यांचे स्मरणार्थ जेऊरकुंभारी येथील सर्वे नंबर १३७ मधील आपल्या मालकीची ३ गुंठे जागा तलाठी कार्यालयासाठी विनामूल्य दिली आहे. आज दि ९ ऑगस्ट रोजी संजय नागरे, पार्वताबाई नागरे, आकाश नागरे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा पवार होत्या.
नागरे परिवाराने जेऊरकुंभारी गावासाठी नेहमीच भरीव मदत दिली आहे. या अगोदर शिक्षणमहर्षी स्व.लहानुभाऊ नागरे यांनी हरिसन ब्रँच जि.प.शाळेसाठी सन १९६२ साली २० गुंठे विनामूल्य जागा दिली होती. नागरे परीवाराने आपल्या मिळकती मधील छोटासा भाग गावाच्या विकासासाठी दिल्याबद्दल संजय नागरे,पार्वतीबाई नागरे, आकाश नागरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच सुवर्णा पवार, उपसरपंच अनिता वक्ते, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, आर.पी.आय प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, संचालक सतिष आव्हाड, माजी संचालक मधुकरराव वक्ते, माजी सरपंच विठ्ठलराव आव्हाड, रामनाथ आव्हाड, दत्तात्रेय आव्हाड, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक दिलीपराव शिंदे, गौतम बँकेचे संचालक बापुराव वक्ते, जेऊर कुंभारी सोसायटीचे अध्यक्ष कर्णासाहेब वक्ते, उपाध्यक्ष दादासाहेब चव्हाण, माजी सरपंच रमेश वक्ते, गंगुबाई जाधव, भाऊसाहेब वक्ते, विजय रोहम, आप्पा शहाजी वक्ते, पाटीलबा वक्ते, लक्ष्मण वक्ते, सोपानराव वक्ते, किशोर वक्ते, धोंडीराम वक्ते, अशोक राऊत, अविनाश आव्हाड, महेंद्र वक्ते, कल्याणराव गुरसळ, कैलासराव वक्ते, यशवंतराव आव्हाड, संजय वक्ते, अशोक आव्हाड, निलेश कातकडे, रामभाऊ आव्हाड, आनंदा चव्हाण, भिकाभाऊ चव्हाण, जालिंदर चव्हाण, विजय वक्ते, सुरेश पगार, बारकु देवकर, पप्पू इंगळे, किरण गुरसळ, किरण वक्ते, विजय शिंदे, निरंजन रोहम, बारसे, बाजीराव वक्ते साहेबराव कोंडाजी वक्ते,सतिष पवार, आनंद आदी उपस्थित होते.
प्रास्तविक माजी सभापती शिवाजीराव वक्ते यांनी केले.
जेऊर कुंभारी येथील प्रस्तावित तलाठी कार्यालय जेऊरकुंभारी व डाऊच खुर्द या दोन्ही गावातील ग्रामस्थांना सोईस्कर असुन गाड्या पार्किंग साठी जागा तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुवर्णा पवार यांनी दिली.