आपला जिल्हापुणेमहाराष्ट्र

नर्सिंग करू इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना ‘सूर्यदत्त’ देणार मोफत शिक्षण सुषमा चोरडिया यांची माहिती; बारावी उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात सेवेची संधी

संपादक मनिष जाधव 9823752964

नर्सिंग करू इच्छिणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना ‘सूर्यदत्त’ देणार मोफत शिक्षण

सुषमा चोरडिया यांची माहिती; बारावी उत्तीर्ण झालेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य क्षेत्रात सेवेची संधी

पुणे प्रतिनिधी मनिष जाधव – नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील गरीब, गरजू व हुशार विद्यार्थिनींना सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंगच्या वतीने मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना आरोग्य क्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी दिली.

औ
उपाध्यक्षा सुषमा चोरडिया

पुण्यातील सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे विद्यार्थ्यांना नर्सिंग क्षेत्रात उच्च दर्जाचे शिक्षण व व्यापक प्रशिक्षण दिले जात असून, नर्सिंग क्षेत्रात कुशल आणि तज्ज्ञ व्यावसायिक निर्माण करण्याच्या उद्देशाने यंदापासून ही संस्था सुरु झाली आहे. अत्याधुनिक शिक्षण तंत्र, वैद्यकीय सुविधा आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम साधून विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्यासपीठ उभारले आहे.

Y

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या कुशल नेतृत्वात व मार्गदर्शनात नर्सिंग क्षेत्रात सूर्यदत्तने पाऊल टाकले आहे. इथे केवळ नर्सिंगचे पुस्तकी धडे शिकवले जात नाहीत, तर प्रत्यक्ष रुग्णसेवा करताना परिचारिका म्हणून कसे काम करावे, याचे प्रात्यक्षिक ज्ञान व प्रशिक्षण दिले जाते. काळानुरूप शिक्षणात झालेल्या आमूलाग्र बदलांनुसार नावीन्यपूर्ण तांत्रिक साधने आणि उपकरणे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातात. नर्सिंग क्षेत्रातील अद्ययावत अभ्यासक्रम आणि विविध तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी महाविद्यालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज प्रयोगशाळा आणि संगणक सुविधा आहेत.

सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी व कुशल प्राध्यापक असून, त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळते. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, नावीन्यता आणि सर्जनशीलतेवर मार्गदर्शन करतात. यामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा क्षेत्रात उत्तम तज्ज्ञ होण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतात. यासह ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांना विविध नामांकित रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. रुग्णांची काळजी कशी घ्यावी, उपचारांची योजना कशी करावी आणि रुग्णांची मानसिक तसेच शारीरिक स्थिती कशी हाताळावी, याचे ज्ञान विद्यार्थ्यांना या रुग्णालयांतून मिळेल. त्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यासह त्यांना व्यावसायिक जीवनात सक्षमपणे काम करण्यास प्रेरणा मिळेल, असे सुषमा चोरडिया म्हणाल्या.

जाहिरात

शैक्षणिक अभ्यासक्रमासह व्यक्तिमत्व विकासावरही सूर्यदत्तमध्ये भर दिला जातो. पदवीधर विद्यार्थ्यांना विविध नामांकित रुग्णालयांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरही काम करण्याची संधी मिळते. नर्सिंग प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० ऑक्टोबर २०२४ अशी आहे. सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंग, पॅरामेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, बावधन, ता. मुळशी, जि. पुणे-४११०२१ या पत्त्यावर अर्ज व शिफारस पत्र पाठवावेत. अधिक माहितीसाठी www.scnpst.org/ या संकेतस्थळावर, तसेच ७७७६०७२०००, ८९५६९३२४०० किंवा ८९५६३६०३६० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

ओ

गरजू मुलींच्या शिक्षणासाठी ‘सूर्यदत्त’चा पुढाकार : चोरडिया

“नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूर्यदत्त कॉलेज ऑफ नर्सिंग हे एक उत्तम ठिकाण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि रुग्णसेवेचा वसा घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे येथे स्वागत होईल. आधुनिक काळात वैद्यकीय सेवेची व्याप्ती वेगाने बदलत असून, त्यानुसार येथे शिक्षण देण्याची सुविधा केली आहे. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थिनी, ज्यांना आर्थिक परिस्थितीअभावी शिक्षण घेणे जिकिरीचे होते, अशा मुलींना सूर्यदत्त संस्थेने नेहमीच मोफत शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपल्या भागातील अशा गरजू मुलींची शिफारस आपण सूर्यदत्तकडे करावी.”

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× आपणांस काय सहकार्य करू