नगरपालिका प्रशासनाने खुले नाट्यगृहाच्या कामाबाबत ची झालेली चूक लपविण्यासाठी ,जनतेला वेड्यात काढायला नाट्यगृह पाडायची नवीन शक्कल / युक्ती काढली तर नाही ना ! – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
गेल्या सव्वा वर्षापासून नगरपालिकेत प्रशासक आहे. त्या मुळे त्यांच्या कडेच नागरिक दाद मागणार. कोपरगाव नगरपालिकेनी खुले नाट्यगृहाचे रिपेअर करून नूतनीकरणाचे ( लोकशाहीर आण्णा भाऊ साठे नाट्यगृह ) काम १ कोटी रुपयाचे टेंडर देऊन काढले.काम सुरू करण्याचे उद्घाटन ही साधारण १ वर्ष पूर्वी झाले. परंतु ते काम अद्याप झाले नाही.म्हणून नाट्यप्रेमीनी काम का झाले नाही .तेथील जुने बांधकामाचे काढलेले मटेरीयल व काम का झाले नाही म्हणून २६ जानेवारीला उपोषणाला बसणार म्हणून निवेदन दिले. परंतु उपोषण करणाऱ्यांना २६ जानेवारी पुरती थांबवण्यात पालिका प्रशासन यशस्वी झाले.
काम का झाले नाही , किती पेमेंट कॉन्ट्रॅक्टर ला दिले , कॉन्ट्रॅक्टर कोण व बांधकामाचे आधीचे मटेरीयल व काम सुरू केले , ते काढलेले मोलाची जाड फर्ची इत्यादी मटेरीयल कुठे आहे.अशी मागणी जनतेची , उपोषण करत्यांची व नाट्यप्रेमी ची होती.
ही झालेली प्रशासनाची चूक झाकण्यासाठी व ठेकेदाराला वाचवण्यासाठी नगरपालिकेने ह्या खुले नाट्यगृह चे बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करायचे आत्ता ठरवले असे गावातील कट्या वर नागरिकांन मध्ये चर्चा आहे / कळते .म्हणजे की ते दाखवणार की या बिल्डिंग चे बांधकामाचे आयुर्मान संपले , ते पडावे लागेल.असा रिपोर्ट येईल , कदाचित घेतील?
मग टेंडर काढायच्या आधीच का नाही बांधकामाचे ऑडिट केले.याचा अर्थ जनतेनी व नाट्य प्रेमींनी काय घ्यावा. हा जनतेच्या करातील पैसा आहे.त्या बद्दल विचारण्याचा हक्क जनतेला आहे.
आता पालिका प्रशासन त्यांची चूक लपवण्यासाठी सांगणार की रिपोर्ट आला , नाट्य गृह पाडावे लागेल.आपण नवीन बांधू. मग असे १ वर्षा पूर्वी का नाही केले. ७ , ८ वर्ष ते रिपेअर केले नाही. जनतेने मागणी केली तर ते रिपेअर चे १ कोटींचे टेंडर काढले आणि काम वेळेत झाले नाही , हे झाकण्यासाठी नवीन शक्कल युक्ती काढली असा आमचा आरोप आहे. तरी हे काम टेंडर निघून , उद्घाटन करून का झाले नाही , तसेच कॉन्ट्रॅक्टर ला किती पेमेंट दिले व कसले दिले, तसेच कॉन्ट्रॅक्टर ला वाचवण्यासाठी तर नाट्यगृह चे ऑडिट करायचे काढून ,त्याला वाचवण्यासाठी नाट्यगृह पाडायचा तर खाट्याटोप तर नाही ना ?? तसेच कॉन्ट्रॅक्टर वर कार्यवाही करायची सोडून ? आत्ता करत असलेल्या ऑडिट बाबत जनतेच्या मनात प्रशासना बाबत शंका निर्माण या पालिकेच्या अशा बचावाच्या धोरण मुळेच निर्माण झाली आहे. याचा खुलासा नगरपालिका प्रशासनाने करावा. ही मागणी जनतेच्या वतीने व नाट्यप्रेमीच्या वतीने मंगेश पाटील यांनी केली आहे.