तिथीप्रमाणे साजरा होणाऱ्या शिवजन्मोत्सव सोहळा २०२३ ची कार्यकारणी जाहिर
कोपरगांव मनिष जाधव – गेल्या ४० वर्षांपासून कोपरगावात अतिशय शिस्तब्ध पद्धतीने तिथी प्रमाणे शिवजयंती उत्सव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी उत्साहात साजरा केला जातो. गेल्या वर्षी ३ दिवसीय डोळ्याचे पारणे फेडणारे भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले होते त्यामुळे या वर्षी कोपरगावकरांमध्ये व शिवसैनिकांमध्ये या कार्यक्रमांविषयी चांगलीच उत्सुकता दिसून येत आहे.
शिवजन्मोत्सव सोहळा २०२३ च्या अध्यक्ष पदी मधुकर पवार, कार्याध्यक्ष मयूर दळवी,उपाध्यक्ष अरुण बोराडे, योगेश उशीर, सुनील कुंढारे, वसीम शेख,सचिव सागर चव्हाण, शिवज्योतप्रमुख रवि पवार, सांस्कृतिक कार्यक्रमप्रमुख संजय बाविस्कर, अशोक पवार, दिपक बरदे, किरण अडांगळे, राज्याभिषेक प्रमुख दिलीप अरगडे, जाफर पठाण, सतीश खर्डे या प्रमाणे समिती नेमण्यात आली. नवनियुक्त समितीला व सदस्यांना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख किरण खर्डे, संदीप दळवी, शहरप्रमुख कलविंदर दडियाल,वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, विकास शर्मा, शेखर कोलते, सहसंघटक अक्षय वाकचौरे, समन्वयक सागर सोमवंशी, प्रवीण शेलार आदींनी मार्गदर्शन केले व सत्कार करून अभिनंदन केले.