आपला जिल्हामहाराष्ट्र

ढोल ताशांच्या गजरात “शुक्राचार्य महाराजांचा” जयघोष  भक्तांचे उत्साही वातावरण ; बच्चे कंपनीचा मोठ्या प्रमाणात उत्साह 

संपादक मनिष जाधव 9823752964

महाराज

ढोल ताशांच्या गजरात “शुक्राचार्य महाराजांचा” जयघोष

भक्तांचे उत्साही वातावरण ; बच्चे कंपनीचा मोठ्या प्रमाणात उत्साह
सोमवार दिनांक १९ आॅगस्ट सकाळी ९ ते १२ प्रायक्षित्त, संकल्प, प्रधान संकल्प, पुण्याहवाचन, देवता आवाहन, आरती, प्रसाद दुपारी २ ते ६ वास्तुमंडल, योगिनी, क्षेत्रपाल, देवता स्थापन, श्री मुर्तीस जलाधिवास, आरती, प्रसाद
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे असलेले संजीवनी मंत्राचे उगमस्थान, अतिशय पौराणिक, प्राचीन व धार्मिक परंपरा असलेले श्री क्षेत्र बेट देवस्थान कोपरगाव येथील जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त पहावा लागत नाही असे परम सदगुरु श्री शुक्राचार्य महाराज मंदिरात रविवार दिनांक १८ आॅगस्ट २०२४ ते  शुक्रवार दिनांक २३ आॅगस्ट २०२४ भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आले असुन दिनांक १८ आॅगस्ट रोजी सोहळ्याची सुरुवात झाली असून प्रथम दिवशी  परम सदगुरु शुक्राचार्य महाराज यांच्या सुंदर मुर्तीची भव्य मिरवणूक महंत रमेशगिरीजी महाराज, राघवेश्वरानंदगिरीजी महाराज, साध्वी शारदा माता देवी, भक्तीचरणदासजी महाराज, रामदासजी महाराज, बालकदासजी महाराज, पद्मचरणदासजी महाराज आदी संतांच्या उपस्थित तहसिल कार्यालय मैदान येथून  सुरुवात करण्यात आली. आज पासून पाच दिवस संपूर्ण कोपरगाव गुरू शुक्राचार्य महाराजांच्या भक्तीत रंगणार आहे.
अ
मिरवणूक मार्गावर रस्त्यावर रांगोळी , फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची सजावट,  स्वागत फ्लेक्स पाहावयास मिळाले. खा सर्वसामान्य व्यक्ती, भक्त परिवार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना, सर्वच नेते मंडळीं, विश्वस्त मंडळ, सभासद यांनी परम सदगुरु श्री शुक्राचार्य महाराजांची मुर्तीची स्वागत करताना अजिबात कोणतेही कसर ठेवली नाही. महाराजांच्या मुर्तीची मिरवणुकीची ढोल-ताशांच्या वादनाने रंगत वाढविली. महाराजांच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तांनी, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महाराजांची मूर्ती, आकर्षक रथ, ढोल-ताशा पथकांची आकर्षक दृश्य टिपण्यासाठी मोबाईल, कॅमेरे सारसावले होते.
ब
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे, शिवसेनेचे कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, माजी नगरसेवक कालुआप्पा आव्हाड, शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ यांच्या आदि पदाधिकारी मिरवणुकीत सहभागी झाले होते.
ओ
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी उपस्थितीत सर्व संतांचे संत पुजन करून स्वागत केले.

औ

ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, सचिव संजीव कुलकर्णी, खजिनदार गजानन को-हाळकर, सदस्य लक्ष्मीकांत कुलकर्णी, हेमंत पटवर्धन तसेच स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे, सदस्य संजय वडांगळे, चांगदेव आव्हाड, भागचंद रुईकर, बाळासाहेब लाकारे, बाळासाहेब गाडे, मधुकर साखरे, सुजित वरखेडे, विजय रोहम, आदिनाथ ढाकणे, विलास आव्हाड, अरुण जोशी, दिलीप सांगळे, दत्तात्रय सावंत, महेंद्र नाईकवाडे, विकास शर्मा, विशाल राऊत, व्यवस्थापक राजाराम पावरा यांच्या आदि विश्वस्त मंडळ, सदस्य, पदाधिकारी, कर्मचारी यांनी मिरवणूक यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!