आपला जिल्हा

ढवळगाव येथील आनंद हॉस्पिटल आय सी.यू मध्ये रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या

संपादक मनिष जाधव 9823752964

ढवळगाव येथील आनंद हॉस्पिटल आय सी.यू मध्ये रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या
श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथील आनंदवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आय.सी.यू (अतिदक्षता विभाग) येथे दिनांक 05 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळच्या 8:30 च्या दरम्यान आयसीयु मध्ये उपचार घेत असलेल्या पेशंटने आय.सि.यु. मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे.
आनंदवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आय.सी.यू
सविस्तर वृत्त अशे की रायगव्हाण येथील चांगदेव नानासाहेब रिकामे वय 46 वर्षे हे ढवळगाव येथील आनंदवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आय.सी.यू येथे उपचार घेत होते.त्यांना तोंडाचा कॅंन्सर झाला होता असे समजत आहे.त्यांनी यापूर्वी पुणे येथे रुबी हॉल मध्ये ऑपरेशन करून उपचार केले होते.परंतु ते 01 आक्टोंबर पासून ढवळगाव येथील आनंदवन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आयसीयू मधे उपचार घेत होते.कॅंन्सरच्या आजाराला कंटाळून त्यांनी चादर फाडुन त्याच्या साहाय्याने आयसीयू मधील फॅनला बांधून फाशी घेतली आहे.बेलवंडी पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा केला असून बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन चे सहाय्यक फौजदार कोळपे हे करत आहे.
अतिदक्षता विभागा मध्ये पेशंट आत्महत्या कसा काय करू शकतो, अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांचा 24 तास स्टाफ असणे गरजेचे आहे.कॅंन्सर च्या उपचाराच्या सुविधा नसतानाही कॅंन्सर सारखा रुग्ण ऍडमिट करून कसा घेतला होता.अशी चर्चा आता नागरिकांमध्ये होत आहे. सदरील हॉस्पिटलने ग्रामपंचायत कडून कोणत्याही प्रकारची न हरकत दाखला घेतलेला नाही असे आता ग्रामपंचायत कडून ही कळत आहे. यापूर्वी गग्रामपंचायत ने तालुका आरोग्य अधिकारी यांना या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाच्या परवानग्या, हॉस्पिटलच्या परवानग्या इत्यादींची मागणी केली होती परंतु तालुका आरोग्य अधिकारी यांनी या  ग्रामपंचायतच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते व कोणतीही परवानगी व लेखी उत्तर दिले नव्हते असे ग्रामपंचायत कडून सांगण्यात आले आहे.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!