डॉ रामदास आव्हाड यांचे धन्वंतरी रुग्णालयात सालाबाद प्रमाणे धनत्रयोदशी जयंती साजरी
कोपरगाव मनिष जाधव – श्री.धन्वंतरी जयंतीच्या निमित्ताने दरवर्षाप्रमाणे या वर्षी ही डॉ.रामदास आव्हाड यांच्या धन्वंतरी आयुर्वेद सुपर स्पेशालिटी पंचकर्म हॉस्पिटल मध्ये श्री.धन्वंतरी पूजन, याग व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. धणे व गूळ हे पित्तशामक आणि उत्साहवर्धक असते, त्यामुळे धन्वंतरी पूजनानंतर धणे आणि गुळाचा प्रसाद सेवन केला जातो.
हर दिन हर किसी के लिये आयुर्वेद हे आयुष मंत्रालयाचे घोषवाक्य लक्षात घेऊन आयुर्वेदाने सांगितलेला आहार आणि विहार, दिनचर्या व ऋतूचर्या पालन केल्यास निरोगी जीवन जगता येते.
धन्वंतरी सुपरस्पेशालिटी आयुर्वेद रुग्णालयात डॉ रामदास आव्हाड यांचे पुतणे व होमिओपॅथ तज्ञ डॉ.संतोष आव्हाड व त्यांच्या पत्नी डॉ.निलिमा यांच्या शुभहस्ते शुक्रवारी धन्वंतरी पूजन व यज्ञ पूजा संपन्न झाली. यावेळी त्यांच्या कन्या डॉ.रिद्धी आव्हाड, बंधू शंकरराव ,बाळासाहेब ,डॉ श्रीमाळी ,सनी आव्हाड तसेच विविध राज्यांतून आलेले प्रशिक्षणार्थी वैद्य, सहकारी, आयुर्वेद डॉक्टर आणि आयुर्वेद प्रेमी मंडळी उपस्थित होती. आयुष मंत्रालयाने यंदा हर दिन हर किसी के लिये आयुर्वेद असे घोषवाक्य दिले आहे. आयुर्वेदाचा घरोघर व प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रसार आणि प्रचार व्हावा, हा हेतू त्यामागे आहे. धन्वंतरी पूजनानिमित्त आम्ही हा विषय जास्ती जास्त लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी दरवर्षाप्रमाणेच या वर्षीही प्रत्येकासाठी आयुर्वेद हा संदेश देणाऱ्या फलकचक्राची सुंदर अशी निर्मिती करण्यात आली होती.
यावेळी डॉ.आव्हाड यांच्या कन्या डॉ.सौ मयुरी आव्हाड-वाघ यांच्या ELNA या कॉस्मोआयुर्वेदा स्किन प्रोडक्ट्स चे प्रीलॉन्चिंग देखील करण्यात आले. यावेळी आमदार आशुतोष काळे, विक्की भैय्या कोल्हे, श्री.परजणे यांच्यासह कोपरगाव शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर्स व रुग्ण उपस्थित होते.
डॉ.आव्हाड यांना आज भारत सरकारच्या आयुष मंत्रालया तर्फे राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याने ते त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी आपल्या एका चित्रफितीद्वारे श्री.धन्वंतरी पूजनासाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले.