जिल्हा बँकस असोसिएशन चा येत्या शनिवारी पुरस्कार सोहळा — सत्येन मुंदडा
कोपरगाव प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी बँकांनी केलेल्या कार्याची दखल व त्यांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन म्हणून अहमदनगर जिल्हा बँक असोसिएशन दरवर्षी उत्कृष्ट कार्य केलेल्या नागरी सहकारी बँकांचा गौरव, पुरस्कार देऊन करत असते यावर्षी पुरस्कार सोहळा येत्या शनिवारी २७ सप्टेंबर रोजी हॉटेल एनराइज, अहिल्यानगर येथे आयोजित केलेले आहे
पुरस्कार वितरण सोहळा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ जी घार्गे साहेब व जी एस महानगर बँकेच्या अध्यक्षा श्रीमती गीतांजलीताई उदय शेळके यांच्या शुभहस्ते होणार आहे.

व्यवसाय वाढ व योग्य एनपीएचे व्यवस्थापन करणाऱ्या बँकांना ‘ ‘ बिंग्स अवॉर्डने ‘सन्मानित करण्यात येणार आहे . व विविध बँकिंग प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या बँकांना ‘ बिट्स अवॉर्ड ‘ ने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या बँकेला उत्कृष्ट नागरी सहकारी बँक, तंत्रज्ञानचा उत्तम वापर करणाऱ्या बँकेला बँकटेक पुरस्कार देण्यात येणार आहे.
तसेच या वर्षी ज्या संचालकाने सहकारी बँक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे त्यांना जीवन गौरव पुरस्कार – बँक ने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास अहमदनगर जिल्हा व परिसरातील 36 बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.
नागरी सहकारी बँकांमध्ये या सोहळ्या बाबत विशेष उत्सुकता असते अशी माहिती असोसिएशन चे चेअरमन श्री सत्येनजी मुंदडा यांनी दिली