आज वाढदिवस साजरा करणार नाही- चंद्रशेखर म्हस्के
कोपरगाव – आज शनिवार दि २८ ऑक्टोबर रोजी असलेला माझा वाढदिवस साजरा करणार नसून तरी माझा वर प्रेम करणाऱ्या असंख्य मित्रांनी मला शुभेच्छा देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे हार, गुच्छ, शाल, नारळ अथवा वस्तू देऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम घेऊ नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया सेल चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर म्हस्के यांनी केले आहे.
नेहमीच सामजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच कोपरगाव तालुक्याचे भाग्य विधाते आमदार आशुतोष काळे यांचे विश्वासू पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया सेल चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर म्हस्के यांचा २८ ऑक्टोबर रोजी असलेला वाढदिवस संपूर्ण कोपरगाव तालुक्यात विविध उपक्रमांनी दरवर्षी साजरा केला जात असतो परंतु या वर्षी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील तसेच राज्यातील विविध भागात अनेक मराठी बांधव अन्न पाण्याविना उपोषणास बसले असून त्यामुळे आपला वाढदिवस साजरा करणे योग्य नसल्याने म्हस्के यांनी जाहीर केले असून त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.