गोविंदा रे गोपाळा…बोल बजरंग बली की जय
रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहीहंडी साजरी
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले… विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी… विविध गाण्यांचा गजर…. हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष… अशा उत्साही वातावरणात रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी दहीहंडीचा आनंद लुटला. “गोविंदा आला रे आला…” “गोविंदा रे गोपाळा…”बोल बजरंग बली की जय” यासारख्या गाण्यावर नृत्य करत ते दहीहंडी उत्साहात साजरी केली.


रेन्बो इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष कांतिलालजी अग्रवाल, सचिव संजय नागरे, विश्वस्त मनोज अग्रवाल, आनंद दगडे, कार्यकारी संचालक आकाश नागरे, संचालक नानासाहेब दवंगे, उपप्राचार्य निलेश औताडे, कार्यालय अधीक्षक रवींद्र साबळे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व कृष्ण पूजनाने झाली. विद्यार्थ्यांनी कृष्णभजन व पाळणा गीत’ सादर केले. बालचमूंनी राधा – कृष्णाची आकर्षक वेशभूषा केली होती. स्कुल मधील दहीहंडी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. विद्यार्थ्यांनी सुंदर मनोरा बनवत ‘मच गया शोर सारी नगरी रे’ या गीतावर ठेका धरत वातावरणात रंगत आणली. शिक्षकही यामध्ये सहभागी झाले होते. दहीहंडी फोडताना कार्यक्रमाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. बालगोपालांनी एकच जल्लोष करीत दहीहंडी फोडली. शिक्षकांनी विद्यार्थ्याना कृष्ण जन्माष्टमी व गोपालकाला यांचे महत्त्व सांगितले.
विद्यार्थ्याना आपल्या सण उत्सवांची माहिती व्हावी, तसेच सण-उत्सवांचा आनंद लुटता यावा, याकरीता दहीहंडी उत्सव रेन्बो इंटरनॅशनल स्कूलचे कार्यकारी संचालक आकाश नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.