Uncategorized

गोदावरी दूध संघाच्या अध्यक्षपदी राजेश परजणे तर उपाध्यक्षपदी गोपीनाथ केदार यांची निवड

संपादक मनिष जाधव 9823752964

गोदावरी दूध संघाच्या अध्यक्षपदी राजेश परजणे
तर उपाध्यक्षपदी गोपीनाथ केदार यांची निवड

कोपरगांव प्रतिनिधी – गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी राजेश नामदेवराव परजणे पाटील यांची तर उपाध्यक्षपदी गोपीनाथ सुलाजी केदार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

अ

विभागीय उपनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी दीपक पराये यांच्या उपस्थितीत संघाच्या सभागृहात मंगळवार दि. २३ मे २०२३ रोजी सभा घेण्यात येऊन पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी राजेश नामदेवराव परजणे तर उपाध्यक्षपदासाठी गोपीनाथ सुलाजी केदार या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने निवड बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदाची सूचना नवनिर्वाचित संचालक गोरक्षनाथ पंढरीनाथ शिंदे यांनी मांडली. त्यास संचालक संजय ज्ञानदेव टुपके यांनी अनुमोदन दिले. तसेच उपाध्यक्षपदाची सूचना संचालिका सौ. सुमनताई सुदाम शिंदे यांनी मांडली त्यास संचालक नानासाहेब रामराव काळवाघे यांनी अनुमोदन दिले.

गोदावरी खोरे दूध संघाची निवडणूक नुकतीच होऊन त्यात राजेश परजणे, गोपीनाथ केदार यांच्यासह विवेक कृष्णराव परजणे, उत्तमराव रामराव डांगे, भाऊसाहेब सुंदरराव कदम, गोरक्षनाथ पंढरीनाथ शिंदे, नानासाहेब रामराव काळवाघे, सुदामराव कारभारी कोळसे, जगदीप आण्णासाहेब रोहमारे, संजय ज्ञानदेव टुपके, भिकाजी दगडू झिंजुर्डे, दिलीप बबनराव तिरमखे, सौ. सुनंदाताई सुभाषराव होन. सौ. सरलाताई सोपान चांदर, सौ. सुमनताई सुदाम शिंदे हे संचालकपदी बिनविरोध निवडून आलेले आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश परजणे यांनी सांगितले की, कोपरगांव तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील दूध उत्पादकांची कामधेनू म्हणून संघाची वाटचाल सुरु आहे. या वाटचालीत आदरणीय आण्णांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा लाभलेला असल्याने संघाने दूध उत्पादकांचे हीत डोळ्यासमोर ठेऊनच वाटचाल सुरु ठेवलेली आहे. सद्या दुग्ध व्यवसायामध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत. अशाही परिस्थितीत संघाने आपले स्थान कायम टिकवून ठेवले आहे. काटकसरीचे धोरण स्वीकारून संघाची वाटचाल पूर्वीपेक्षाही अधिक गतिमान होण्यासाठी सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सहकार्याने आपल्याला काम करावे लागणार असल्याचेही राजेश परजणे यांनी सांगितले.

पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी विशेष परिश्रम घेतले. निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित संचालकांनी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या स्मृतीस्थळास भेट देऊन प्रतिमेस अभिवादन केले.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× आपणांस काय सहकार्य करू