गूरुमाऊली व गूरुकूल ने आपल्या कार्यकाळात एकाही महिलेला चेअरमन पदाची संधी दिली नाही – माधव हासे
महिलांच्या सन्मानाच्या नावाखाली 09 लाखाचा भ्रष्टाचार
अहमदनगर प्रतिनिधी – सावित्रीच्या लेकी पूरस्कार कार्यक्रमातून गुरुमाऊलीने केला भ्रष्टाचार केला.तीन तासांच्या कार्यक्रमाचा खर्च तब्बल 9 लाख 22 हजार 281 दाखवुन महिलांच्या सन्मानाच्या नावाखाली सभासदांचे पैसे हडप केले. असा घणाघात जिल्हा संघाचे अध्यक्ष माधव हासे यांनी करुन यांना घरचा रस्ता दाखवा ,आणि शिक्षक बँक व विकास मंडळ निवडणुकीत कपबशीला मतदान करुन सदिच्छा,बहुजन,शिक्षक संघ व साजिर महिला आघाडीला मोठ्या मताने निवडुन द्या असे आवाहन केले आहे.
सभासदांच्या वाट्याच्या नफ्यातून शताब्दी निधीसाठी गुरुमाऊलीने वेळोवेळी शताब्दी निधीसाठी एकुण *एक कोटी रुपये* बाजुला काढले, व तो पैसा मनमानेल पद्धतीने उधळुन पैशाचा चुराडा केला!त्यातुन जिल्ह्यातील गुणवंत शिक्षिकांना *सावित्रीच्या लेकी* नावाने पुरस्कार देण्याचे त्यांनी ठरवले! यात विरोधी मंडळांना आजिबात विश्वासात घेतले नाही,तसेच विरोधी मंडळांना मानणार्या भगिनींचा पुरस्कारात समावेशही केला नाही! सन 19/20 मध्ये घेतलेल्या या कार्यक्रमात 150 गुणवंत भगिनिंना सन्मानित करुन मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक व फेटा घालुन गौरव करण्यात आला!ही बाब अभिनंदनीय असली तरी त्यासाठी दाखवलेला खर्च हा पुर्णपणे बनावट व खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे!
तीन तासाच्या या कार्यक्रमासाठी गुरुमाऊलीने 9लाख 22 हजार281 इतका रक्कमेचा खर्च दाखवण्यात आला आहे. महिलांचा सन्मान करणे चांगलीच बाब!, पण त्या आडुन भ्रष्टाचार करणार्या गूरुमाऊलीचा निषेध करावा तितके थोडेच आहे! सभासद यांना माफ करणार नाही.
महिलांचा सन्मान करतांना एकाही भगिनी संचालकांना सहा वर्षात दोन चार महिन्यांसाठी *चेअरमन* करावेसे वाटले नाही.चेअरमन पदांची खैरात वाटण्यात आली,दर चार महिन्याला चेअरमन,व्हाईस चेअरमन बदलण्याची जणु स्पर्धाच लागली होती!चेअरमन,व्हा.चेअरमन ही पदे वाटतांना मोठ्या प्रमाणात घोडेबाजार नेत्यांनी केला! मात्र जिल्ह्यात साडेचार हजार महिला शिक्षिका असतांना त्यांचे नेतृत्व करणार्या एकाही महिला संचालिकेस चेअरमन करुन महिलांचा सन्मान त्यांना करावासा वाटला नाही,
गूरुकूल मंडळानेही त्यांच्या काळात एकाही महिलेला चेअरमन पदाची संधी न देता घोडेबाजार केला, 16 तारखेलाला होणार्या बँक निवडणूकीत दोन्ही गूरुमाऊलीला व गूरुकुल मंडळाला सभासदंनी घरचा रस्ता दाखवा! व सदिच्छा, बहुजन, शिक्षक संघ व साजिर महिला आघाडीला मोठ्या मतांनी निवडुन द्या!असे आवाहन बाळासाहेब मोरे,विनोद सोनवणे,दत्तात्रय राऊत,वाल्मिक गायकवाड, निलांबरी लाड, प्रमोद रणधीर, प्रमोद दारकुंडे, सुभाष पायमोडे, राहुल घोडे, जनार्दन भवरे, कविता कूमावत, सुनिता राऊत, विद्या मैड, कामिनी राजगूरु, विद्या झंजाड, संगिता कदम, यांनी केले आहे!