कोहिनूर मॉलमध्ये जय तुळजा भवानी तरुण मंडळाचा ढोल ताशा कडाडला
कोपरगाव मनिष जाधव –
कोहिनूर मॉल अहिल्यानगर आयोजित ढोल पथक स्पर्धा २०२५ मोठ्या दिमाखात पार पडली.नगरसह पंचक्रोशीतील अनेक जिल्ह्यातून आलेल्या पथकांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये जय तुळजा भवानी तरुण मंडळ कोपरगांव यांनी उत्कृष्ट वादन करत चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.आपली भाषा ढोल ताशा या ध्येयाने प्रेरित असणारे सर्व वादक पथके जल्लोषात सामील झाले होते.प्रेमदान चौक अहिल्यानगर येथे कोहिनूर मॉलमध्ये ढोल ताशाच्या निनादाणे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.
जय तुळजा भवानी तरुण मंडळ हे गेले १९८३ पासून विविध सांस्कृतिक आणि अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करत असते. अतिशय अर्थपूर्ण देखावे गणेशोत्सवात साकारणे ही या मंडळाची वेगळी ओळख अनेक वर्षे राहिली आहे. ढोल ताशा स्पर्धेची तयारी व सराव करत अनेक युवकांना या कलेची गोडी सर्व सदस्यांनी लावली आहे त्याचे हे यश असल्याचे बोलले जात आहे.
कोपरगावच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवणाऱ्या या पथकाचे आणि सर्व सदस्यांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे,कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे आणि अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी अभिनंदन केले आहे.कोपरगाव शहरात या मंडळावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.