कोपरगाव शहरात सोमवारी काँग्रेसची पद यात्रा व जाहीर सभा – आकाश नागरे
भारत जोडोच्या वर्षपूर्ती निमित्त काँग्रेसची भव्य रॅली
पदयात्रा रुट
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक सुरूवात – भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक – धरणगाव रोड – तहसील कार्यालय – अहिंसा चौक – छत्रपती शिवाजी महाराज – महात्मा गांधी चौक दिलेल्या रुप प्रमाणे पदयात्रा होणार आहे.
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव– काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुल गांधी यांनी देशातील एकात्मता व लोकशाही टिकवण्यासाठी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त जिल्हा काँग्रेसच्या वतीने कोपरगांव शहरात सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वा. जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, देशात वाढलेली बेरोजगारी, महागाई ,आर्थिक संकट, मणिपूर सह इतर राज्यांमध्ये निर्माण झालेली अशांतता, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, विविध समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न, महिलांची सुरक्षितता, भारताच्या भूभागावर चीनचे होणारे आक्रमण यांसह विविध प्रश्नांमुळे देशांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. याबाबत जनजागृतीसह अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खा राहुल गांधी यांनी काढलेल्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त कोपरगाव शहरांमध्ये भव्य पदयात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक येथून सुरू होणाऱ्या या पद यात्रेमध्ये जिल्हा काँग्रेस ज्येष्ठ नेत्या सौ. लताताई डांगे, राज्य महिला आयोग सदस्या उत्कर्षाताई रुपवते, रावसाहेब टेके ज्येष्ठ नेते, तुषार पोटे शहराध्यक्ष, रवींद्र साबळे तालुका काँग्रेस सरचिटणीस, छोटुभाई पठाण अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष, यादवराव त्रिभुवन आ.जा. तालुकाध्यक्ष, विष्णू पाडेकर किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष, विजय मोरे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या पदयात्रा ही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक सुरूवात – भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक – धरणगाव रोड – तहसील कार्यालय – अहिंसा चौक – छत्रपती शिवाजी महाराज – महात्मा गांधी चौक दिलेल्या रुप प्रमाणे पदयात्रा होणार आहे. तालुका व शहरातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी युवक, महिला काँग्रेसच्या सर्व सेलचे सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी केले आहे.