कोपरगाव येथील प्रतित्र्यंबकेश्वर मंदीरात दर्शनासाठी मोठी गर्दी
श्रावण सोमवार भक्तीमय वातावरणात
कोपरगाव मनिष जाधव – दुःख, दारिद्र्य नष्ट होवो, सुख-समृद्धी दारी येवो, श्रावण सोमवारच्या शुभदिनी सर्व मनोकामना पूर्ण होवो… अशा शुभेच्छांसह सर्वांसाठी प्रार्थना करत तिसरा श्रावण सोमवार भक्तिमय वातावरणात झाला. दरम्यान, दिवसभर कोपरगाव येथील प्रतित्र्यंबकेश्वर म्हणून ख्याती बेट भागात असलेले कचेश्वर देवस्थान मंदीरात प्रत्येक वर्षी महाशिवरात्री व श्रावण महिन्यात पहिल्या दिवसापासून हजारो भाविक पहाटे पासूनच दर्शन घेतात. आजच्या चौथ्या श्रावण सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.



आनंद, उल्हास, भक्ती, व्रत-वैकल्ये आणि सण-उत्सवांचा महिना म्हणून मराठमोळ्या श्रावण महिन्याची ओळख आहे. महादेवाचा वार असल्याने श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्त्व आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवाची पूजा करण्याची धार्मिक परंपरा आहे. त्यानुसार तिसऱ्या सोमवारची शिवामूठ जव आले. श्रावण महिन्यात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असतीच यावेळी कोपरगाव येथे प्रतित्र्यंबकेश्वर मंदीराचा इतिहास जगभरात माहिती होताच कोपरगाव तालुक्यासह शिर्डी , राहाता, येवला, वैजापूर , नाशिक, सिन्नर, निफाड , ओझर, मनमाड, छत्रपती संभाजीनगर सह जवळपासच्या शहर व तालुक्यातील जिल्ह्यातील भाविकांनी यावेळी श्रावण सोमवारी कोपरगाव येथील प्रतित्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी अबालवृद्ध-भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

मंदीरात रोज सेवेसाठी येणारे शिव भक्तांच्या वतीने प्रत्येकी श्रावण सोमवारी प्रसाद वाटप केले यावेळी रमेश/ काशिनाथ भाऊराव क्षिरसागर आखिल गुरुव समाज महाराष्ट्र राज्य देवस्थान सचिव(पुजारी), व विनायक क्षिरसागर, कचेश्वर पुजारी,शिव भक्त नाना भुजबळ, सागर चव्हाण, संतोष आठिया, अक्षय कुलकर्णी, अर्जुन चव्हाण, अजय सुपेकर यांच्यासह शिव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मंदिराची अतिशय उत्तम देखभाल गुरव क्षीरसागर व समस्त गुरव क्षीरसागर परिवार तसेच स्थानिक दानशूर व्यक्ती तसेच पंचक्रोशीतील दानशूर व्यक्ती यांच्यामुळे व कचेश्वर मित्र मंडळ तसेच स्थानिक नागरिकांचा मोठा वाटा आहे या सर्वांच्या सहकार्यानेच हे मंदिर अतिशय सुस्थितीत भाविकांना आढळत आहे भाविक भक्तांकडून या सर्वांचे तोंड भरून कौतुक केले जात आहे.