कोपरगाव मध्ये नगराध्यक्ष पदासाठी स्पर्धा वाढली;
इच्छुक उमेदवारांची लढत तगडी ; ओबीसी ला प्रथम प्राधान्य द्या
कोपरगाव मनिष जाधव – नगराध्यक्ष पदासाठी कोपरगावमध्ये उमेदवारी मिळविण्याच्या दृष्टीने चांगलीच स्पर्धा सुरू झाली आहे. शहरातील राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक क्षेत्रातील विविध इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली असून, मतदारांमध्ये उत्सुकतेची लाट पसरली आहे. या निवडणुकीत स्पर्धा फक्त उमेदवारांच्या संख्येवर नाही, तर त्यांच्या कामगिरी, अनुभव, समाजसेवा व मतदारांशी संवाद या सर्व पैलूंवर अवलंबून आहे.
सध्या प्रमुख इच्छुक उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, माजी नगरसेवक दिनार कुदळे, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, तरुण नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणारे पराग संधान, सामाजिक कार्यकर्ते वैभव गिरमे, डॉ. तुषार गलांडे तसेच सुनील फंड , मनसेचे सतिष काकडे यांच्या नावाने शहरात चांगलीच चर्चेने जोर धरला आहे. जाहीर झालेले आरक्षण आपल्या सोयीचे आरक्षण न पडल्याने अनेकांचे जीव एक प्रकारे भांड्यात पडला केलेल्या नियोजनवर सर्व पाणी फिरले परंतु ओबीसी च्या जागेवर राजकीय नेते मंडळी यांनी देखील ओबीसीचा उमेदवार द्यावे अशी मागणी आता नागरिकांच्या माध्यमातून सुरू झाली आहे.
कोविड व महापुर काळात माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी नागरिकांसाठी केलेल्या मदतीचे काम, आरोग्य व सामाजिक सुविधांवरील विशेष लक्ष, तसेच स्थानिक लोकांशी नियमित संवाद यामुळे त्यांना मतदारांमध्ये विश्वास मिळाला आहे.
माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे व माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांचा अनुभव आणि शहरातील विकास कामकाजाची माहितीचा त्यांना मोठा फायदा होऊ शकतो, पराग संधान हे तरुण नेतृत्वाचे प्रतीक असून, नवीन विचार व आधुनिक दृष्टिकोन नगरपालिकेत आणण्याच्या दृष्टीने चर्चेत आहेत. विविध समुदायांचे प्रतिनिधित्व, आरक्षण व्यवस्थेतील बदल, आणि स्थानिक समस्यांवरील कार्यक्षमता ही मुद्दे मतदारांच्या पसंतीवर परिणाम करणारी आहेत.
शहर विकासाच्या दृष्टीने, रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा, स्वच्छता आणि नागरिकांच्या कल्याणाच्या योजना या सर्व बाबींवर उमेदवारांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या पूर्वीच्या कामगिरीचा, विकास प्रकल्पांचा आणि सामाजिक योगदानाचा उपयोग मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
सुरू असलेल्या या स्पर्धेत अनुभव व नवीन दृष्टिकोन यांचा समतोल महत्त्वाचा ठरेल. मतदार आपल्या भविष्यातील नगराध्यक्षाची निवड करताना सजग असतील, त्यामुळे प्रत्येक उमेदवार आपले बळ अधोरेखित करण्यासाठी सज्ज आहे.
सध्या कोपरगाव नगराध्यक्ष पदासाठीची ही स्पर्धा केवळ राजकीय लढत नाही, तर शहराच्या भविष्यासाठी सामाजिक, विकासात्मक आणि नेतृत्वक्षमतेच्या पैलूंवर आधारित महत्त्वपूर्ण निवड ठरत आहे. मतदार या लढतीवर काळजीपूर्वक नजर ठेवत आहेत, आणि पुढील काही आठवड्यांतच या स्पर्धेचे स्वरूप स्पष्ट होईल. कोपरगाव मध्ये तब्बल ३० ते ३५ वर्षांनी ओबीसी साठी संधी मिळत असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहेत यात विशेष म्हणजे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्या नावाला ओबीसी म्हणून पसंती मिळत आहे. राजकीय नेते मंडळी यांनी देखील योगेश बागुल यांच्या माध्यमातून मुळ ओबीसी ला व्यक्तीला प्राधान्य देऊन नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर नक्कीच उमेदवाराला मोठा पाठिंबा मिळू शकतो विशेष म्हणजे समाजातील युवक वर्ग, व्यापारी व नागरिक घटक यांचे समर्थन मिळाल्यास ओबीसी चेहरा नगराध्यक्षपदावर निवडून येणे निश्चित होऊ शकते.