कोपरगांव बाजार समितीत नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्र सुरु- नामदेव ठोंबळ
कोपरगांव:- कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीत केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरू झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक एन.जी.ठोंबळ यांनी दै. जनसंजीवनी शी बोलतांना दिली.
श्री.ठोंबळ पुढे बोलतांना म्हणाले की, केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेअंतर्गत सन 2022-23 या वर्षाकरिता हरभरा खरेदी केंद्र कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समिती येथे सुरू झाले आहे. ज्या शेतक-यांना नांव नोंदणी करावयाची आहे. त्यांनी दिनांक ०८ मार्च २०२३ पासून आपली नावे बाजार समिती कार्यालयात प्रत्यक्ष येवून नोंदवावीत. शासनाने धान्य़ खरेदीचे दर जाहीर केले आहेत. हरभरा पिकासाठी ५ हजार ३३५ रूपये प्रती क्विंटल असा भाव आहे. तरी ज्या शेतक-यांना आपला शेतमाल द्यावयचा असेल, त्यांनी आपली नावे नोदवितांना कागदपत्रे ऑनलाईन ई पीक पेरा असलेला चालु वर्षाचा ८ अ व ७/ १२ उतारा तलाठी यांच्या स्वाक्षरीसह, आधारकार्ड झेरॉक्स़, राष्ट़्रीयकृत बँक पासबुक सुस्पष्ट़ झेरॉक्स़, मोबाईल नंबर देवून ऑनलाईन नोंदणी करावी. ऑनलाईन नोंदणीनंतर माल खरेदीबाबत शेतक-यांना SMS पाठविण्यात येईल. त्यानंतर नाफेडच्या ग्रेडरने स्विकारलेला माल खरेदी करण्यात येईल व तद्नंतर नाफेडमार्फत शेतक-यांच्या खात्यावर ऑनलाईन शेतमालाची रक्क़म जमा करण्यात येईल. तरी या योजनेचा कोपरगांव तालुक्यातील हरभरा उत्पादक शेतक-यांनी जास्तीत जास्त़ लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव श्री.एन.एस.रणशुर यांनी केले आहे.