आपला जिल्हा

कोपरगांव पिपल्स बँकेसाठी ५७ टक्के मतदान ; २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

संपादक मनिष जाधव 9823752964

पिपल्स बँकेसाठी २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

कोपरगांव पिपल्स बँकेसाठी ५७ टक्के मतदान

      २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

आमचाच विजय निश्चितच 
निवडणुक म्हणटले की त्यात कोणाला तरी यश मिळते तर कोणाला अपयश येते माञ आज झालेल्या निवडणुकीत चक्क  सर्व उमेदवारांनी आपला विजय निश्चितच पक्का असल्याचा दावा केला असला तरी खरी परिस्थिती काय आहे हे त्याच्या चेहऱ्यावर ” कभी खुशी कभी गम” दिसुन येत होते. 
कोपरगांव प्रतिनिधी मनिष जाधव – अहमदनगर जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून नावलौकीक असलेल्या कोपरगांव पिपल्स बँकेच्या नुतन संचालक मंडळाच्या सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी व्यवस्थापकीय समितीच्या १७ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात होते. ४ हजार ३२१ सभासदांपैकी २ हजार ४७० सभासदांनी रविवारी मतदानाचा हक्क बजावले. कुठलेही अनुचित प्रकार न होता शांततेत ५७. १६ टक्के मतदान झाले. मागील पंचवार्षिक  निवडणुकीत ४७ टक्के मतदान होते. बँकेच्या निवडणुक रिंगणात असलेले २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असुन मतमोजणी सोमवारी सकाळी सुरु करण्यात येणार आहे. 
कोपरगांव पिपल्स बँकेसाठी ५७ टक्के मतदान मतपेटीत बंद
माजी आमदार अशोकराव काळे, ज्येष्ठ नेते पदमाकांत कुदळे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, राज्य सहकारी दुध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे, ज्योती पतसंस्थेचे चेअरमन अॕड रविंद्र बोरावके
यांच्यासह अनेक प्रतिष्ठात व्यक्तींनी देखील मतदानाचा हक्क बजावले.
मतदान केंद्रावर झालेल्या या मतदानाला सकाळच्या सत्रात थंडा प्रतिसाद असल्याने अनेक प्रश्न उमेदवारांच्या मनात उपस्थितीत होत होते. सकाळी १० ते दुपारी ०२ च्या दरम्यान मतदान केंद्रावर मतदानासाठी रांग लागल्याचे चित्र होते. सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांनी कामकाज पाहिले तर सहाय्यक निवडणुक  निर्णय अधिकारी आर.एन. राहणे, क्षेञिय अधिकारी संदीप नेरे, मतदान केंद्राध्यक्ष भानुदास पानगव्हाणे तर केंद्र प्रमुख म्हणून  ए.एस. पटेल, आर.एस. कदम, एस. बी. क्षीरसागर, एन.एम. नागरे, अशोक केंदाळे, आर.के. जाधव, अशोक घेर, संदीप बढे, गौतम देवळालीकर, एस.डी. गोसावी यांनी केंद्र प्रमुख म्हणून कामकाज पाहिले. कोपरगांव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या ठिकाणी पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.
सहकार व बँकिग क्षेत्रात मोठे योगदान असतांना देखील बँकेची निवडणुक प्रतिष्ठेची झाल्याने  उमेदवारांना देखील मतदान मिळविण्यासाठी  सभासदांपुढे हातच जोडावे लागले.
कोपरगांव पिपल्स बँकेसाठी ५७ टक्के मतदान
सर्वसाधारण मतदारसंघ  
कंगले सुनील दत्तात्रेय (कपबशी), काले अतुल धनालाल (कपबशी), केकान जनार्दन शांताराम (पंखा), कोठारी विजय रूपचंद (छत्री), ठोळे कैलासचंद भागचंद (कपबशी), ठोळे रवींद्र रतनचंद (कपबशी), पांडे दीपक माणिकचंद (कपबशी), बंब सुनील शांतीलाल (कपबशी),
बज सुधीर सोहनलाल (सनई चौघडा), बागरेचा धरमकुमार माणकलाल (कपबशी), बोरा सुनीलकुमार शांतीलाल (कपबशी) , मुंदडा सत्यम सुभाष (कपबशी), लोढा जितेंद्र बाबूलाल (बॅट), लोहाडे रवींद्र शांतीलाल (कपबशी), शाह कल्पेश जयंतीलाल (कपबशी),शिंगी राजेंद्र मोतीलाल (कपबशी)
मतदारसंघ अनुसूचित जाती जमाती 
आबनावे यशवंत रामचंद्र (विमान), लोहकरे भाऊसाहेब शंकर (कपबशी)
मतदारसंघ महिला प्रतिनिधी
गंगवाल ञिशला सुनील कुमार (कपबशी) , बज संगीता सुधीर (नारळ), शिलेदार प्रतिभा सुनील (कपबशी)
मतदारसंघ भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग
आव्हाड वसंतराव फक्कडराव (कपबशी), केकान जनार्दन शांताराम (किटली)
यंदाची होणारी कोपरगांव पिपल्स बँकेची निवडणुक ही प्रतिष्ठेची झाल्याने निवडणुकीत काय घडणार, कोणाचा फायदा कोणामुळे होणार तर कोणाचा तोटा होणार हे निकाल जाहिर होताच सर्वांच्या समोर येणारच आहेत. मतमोजणी सोमवार दिनांक ०६ फेब्रुवारी  रोजी होणार असुन निकालाची उत्सुकता सार्वांना लागलेली आहे.
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!