कोपरगांव पिपल्स बँकेची निवडणुक ०५ फेब्रुवारी रोजी ; १७ जागेसाठी २३ उमेदवार रिंगणात
दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला
कोपरगांव प्रतिनिधी मनिष जाधव – कोपरगांव येथील पिपल्स को.आॕप बँकेची सन २०२२ ते २०२७-२८ या कालावधीच्या संचालक मंडळाची निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. सदरची निवडणुक ही १७ जागांसाठी असुन २३ उमेदवार रिंगणात उतरल्याने काही दिग्गज उमेदवारांची साठी प्रतिष्ठा पणाला लागली असुन बँकेचे सभासद ४ हजार ३२१ सभासद हे ०५ फेब्रुवारी रोजी मतदानाचा हक्क बजावणार आहे. तसेच मतमोजणी ०६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र राहणे हे कामकाज बघत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुक पाठोपाठ आता सहकारी संस्थाचे देखील निवडणुकीचे बिगुल वाजले असुन राज्यात अनेक ठिकाणी सहकारी संस्थेची निवडणुका सुरु झाले त्यातच कोपरगांव पिपल्स को. आॕप बँकेची निवडणुक ०५ फेब्रुवारी रोजी होणार असुन १७ जागांसाठी २३ रिंगणात उमेदवार उतरले आहे. यंदाची निवडणुक बिनविरोध होणार असे चिन्हस्पष्ट असतांना उमेदवारांचे एकमत न झाल्याने सर्वांना निवडणुकीस सामोरे जावे लागत आहे. उमेदवारांची सभासंदाकडे फेऱ्या तसेच आश्वासने सुरु असली तरी यंदा सभासद निवडून देतांना खाञीदायकच उमेदवार निवडून देणार असल्याचे सभासदांच्या चर्चेतुन समोर येत आहे.
कोपरगांव पिपल्स बँकेची निवडणुक कार्यक्रम जाहिर होताच अनेक इच्छुक उमेदवारांनी संचालक पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन होते परंतु अनेक संकट किंवा स्पर्धा असल्याने काही इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याच्या अगोदरच निवडणुकीतुन बाहेर पडले आहे. रिंगणात असलेले सर्व उमेदवारांची नावे व चिन्ह पुढीलप्रमाणे.
सर्वसाधारण मतदारसंघ
कंगले सुनील दत्तात्रेय (कपबशी), काले अतुल धनालाल (कपबशी), केकान जनार्दन शांताराम (पंखा), कोठारी विजय रूपचंद (छत्री), ठोळे कैलासचंद भागचंद (कपबशी), ठोळे रवींद्र रतनचंद (कपबशी), पांडे दीपक माणिकचंद (कपबशी), बंब सुनील शांतीलाल (कपबशी), बज सुधीर सोहनलाल (सनई चौघडा), बागरेचा धरमकुमार माणकलाल (कपबशी), बोरा सुनीलकुमार शांतीलाल (कपबशी), मुंदडा सत्यम सुभाष (कपबशी), लोढा जितेंद्र बाबूलाल (बॅट), लोहाडे रवींद्र शांतीलाल (कपबशी), शाह कल्पेश जयंतीलाल (कपबशी),शिंगी राजेंद्र मोतीलाल (कपबशी)
मतदारसंघ अनुसूचित जाती जमाती
आबनावे यशवंत रामचंद्र (विमान), लोहकरे भाऊसाहेब शंकर (कपबशी)
मतदारसंघ महिला प्रतिनिधी
गंगवाल ञिशला सुनील कुमार (कपबशी) , बज संगीता सुधीर (नारळ), शिलेदार प्रतिभा सुनील (कपबशी)
मतदारसंघ भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग
आव्हाड वसंतराव फक्कडराव (कपबशी), केकान जनार्दन शांताराम (किटली)
यंदाची होणारी कोपरगांव पिपल्स बँकेची निवडणुक ही प्रतिष्ठेची झाल्याने निवडणुकीत काय घडणार, कोणाचा फायदा कोणामुळे होणार तर कोणाचा तोटा होणार ही वेळ आल्यावरच कळेल निवडणुकीत काय काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.