कोपरगांव तालुका केमिस्ट असोसिएशन नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये अग्रेसर – विवेक कोल्हे
कोपरगाव प्रतिनिधी – देशातील पहिला सहकारी कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.एन.जी) प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्प सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. व संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून सुरू केल्या बद्दल, कोपरगांव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने, केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे सभागृह, केमिस्ट भवन, कोपरगांव येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.

विवेक भैय्या कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले की,
देशातील पहिला सहकारी कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.एन.जी) प्रकल्प आणि स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्प सुरू केला, हा केवळ कारखाना किंवा ग्रुपसाठीच नव्हे, तर संपूर्ण सहकार क्षेत्रासाठी आणि पर्यावरणासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद क्षण आहे. सी.एन.जी. (CBG) प्रकल्प हा भविष्यातील ऊर्जेची गरज ओळखून टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, कारखान्याचे उप-उत्पादने वापरली जातील आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास हातभार लागेल.

तसेच, स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्प शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारखान्यातील वेस्ट (स्पेंटवॉश) मधून उच्च प्रतीचे पोटॅश खत तयार होईल, जे शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध होईल आणि जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत करेल. हा एका अर्थाने ‘कचऱ्यातून खत’ (Waste to Wealth) निर्माण करण्याचा आदर्श प्रकल्प आहे. या दोन प्रकल्पांमुळे सहकार क्षेत्रात चक्रीय अर्थव्यवस्थेचा (Circular Economy) एक नवा आदर्श निर्माण झाला आहे, आणि मला आनंद आहे की कोपरगांवच्या भूमीतून याची सुरुवात झाली आहे.

आपल्या कोपरगांव तालुका केमिस्ट असोसिएशनने माझ्या कामाची दखल घेऊन, आज माझा जो गौरव केला, त्यामुळे मला नवी ऊर्जा आणि अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. कोपरगांव तालुका केमिस्ट असोसिएशन नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांमध्ये अग्रेसर असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले.
यावेळी अध्यक्ष गणेश, वाणी, उपाध्यक्ष भारत मोरे, सचिव प्रवीण गवळी, खजिनदार – सौ.रुपालीताई मते, अमृत संजीवनीचे अध्यक्ष परागजी संधान साहेब, दीपक चौधरी, अनिल आहेर, सचिन सावंत, अनुप डागा, आकाश वडांगळे, सचिन अमृतकर, विजय जगताप, ऋतूल जाधव, प्रशांत बोरावके, नितीन खैरनार, शामसुंदर डागा, संदीप डागा, जितेंद्र गंगवाल, सुरेंद्र ठोळे यांच्यासह कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.