Uncategorized

केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत  कोपरगांव तालुका केमिस्ट असोसिएशनचे नुतन केमिस्ट भवन वास्तूचे उद्घाटन होणार – गणेश वाणी

मनिष जाधव 9823752964

केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत

कोपरगांव तालुका केमिस्ट असोसिएशनचे नुतन केमिस्ट भवन वास्तूचे उद्घाटन होणार – गणेश वाणी 

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – 
देशभरातील सुमारे साडेबारा लाख केमिस्ट्स ला  एकत्रित करून संघटित ठेवणारे, जगभरातील बड्या भांडवलदारांच्या औषध विक्री व्यवसायात चेन शॉपी देशात येऊ घातल्यानंतर केमिस्ट बांधवांचा आत्मविश्वास जागा करणारे, औषध विक्रेत्यांना प्रशिक्षण देऊन जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविणारे व देशभरातील औषध विक्रेत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले जगन्नाथ शिंदे ऊर्फ आप्पा यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा तसेच  अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे कोपरगांव तालुका केमिस्ट असोसिएशन नुतन केमिस्ट भवन वास्तूचे उ‌द्घाटन  रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे माहिती कोपरगांव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी यांनी दैनिक जनसंजीवनी शी बोलतांना सांगितले.

आप्पा

बिल्डिंग

आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी केमिस्ट हृदयसम्राट मा. आमदार श्री. जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे (अध्यक्ष, अखिल भारतीय व महा. राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असो., मा. विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य),  कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष अशोकराव काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना चेअरमन विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे साहेब, गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पा. सह. दूध उत्पा. संघाचे चेअरमन राजेशजी परजणे पाटील, अध्यक्ष,महा‌. राज्य औषध व्यवसाय परिषदचे  अध्यक्ष अतुल अशोकराव अहिरे, सेंट्रल झोन, एम.एस.सी.डी.ए. चे अध्यक्ष नरेश विद्याप्रकाश भगत, सेंट्रल झोन, एम.एस.सी.डी.ए. चे उपाध्यक्ष शशांक हनुमंत रासकर, सेंट्रल इझोन, एम.एस.सी.डी.ए.चे सचिव महेश भिकाजी भावसार, ए.डी.सी.डी.ए. व संस्थापक अध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष, जवाहरलाल शांतीलाल शहा, अन्न व औषध प्रशासन, अ.नगर सहाय्यक आयुक्त, अशोकजी बर्डे, अत्र व औषध प्रशासन, सातारा चे औषध निरीक्षक डॉ. ज्ञानेश्वरजी दरंदले, ए.आय.ओ.सि.डी.ए. चे निमंत्रित सदस्य अजित संपतलाल पारख, ए.आय. ओ. सि.डी.ए. फार्मा. लि.संचालक रविंद्र बाजीराव पवार, अन्न व औषध प्रशासन, अ.नगर चे सहाय्यक आयुक्त हेमंतजी यशवंत मेतकर, सेंट्रल झोन, एम. एस. सी. डी. ए. चे संघटक सचिव, चेतन माधव कर्डिले, ओमप्रकाशजी गुलाटी ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र गिरधारीलाल गुलाटी, अन्न व औषध प्रशासन, अ.नगर औषध निरीक्षक जावेदजी शेख, अन्न व औषध प्रशासन, अ. नगर चे औषध निरीक्षक माधवजी निमसे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
परिका
सदर कार्यक्रमाचे विनीत आबासाहेब बेद्रे ( सचिव), दत्ता गाडळकर ( अध्यक्ष), प्रशांत उबाळे (खजिनदार) यांचे सर्व अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच सदर कार्यक्रमाचे निमंत्रक
उपाध्यक्ष, अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएन) (अध्यक्ष, कोपरगांव तालुका केमिस्ट असोसिएशन, कोपरगांव चे गणेश उर्फ गजानन जनार्दन वाणी, विजय बबनराव जगताप (जिल्हा कार्य. सदस्य), सचिन हरिभाऊ अमृतकर(जिल्हा कार्य. सदस्य), भरत आसाराम मोरे (उपाध्यक्ष), सौ. कावेरीताई अनिल आहेर (कार्याध्यक्ष), प्रविण अशोकराव गवळी (सचिव), सौ. रूपालीताई उत्तम पाटील (मते) (खजिनदार), अजय अमृत शहा (विश्वस्त), मंदार सुभाष पहाडे (विश्वस्त), अपर्णाताई निलेश गाडेकर (विश्वस्त), श्रीकांत श्रीकृष्ण पैठणे (विश्वस्त), नितीन भागीनाथ खैरनार (पा. उपाध्यक्ष), प्रशांत विजय बोरावके (सह. सचिव), संदिप शिवदास डागा (सह. खजिनदार), ऋतुल प्रकाश जाधव (जनसंपर्क अधि.), संदिप नेमिचंद गोलेचा (स्विकृत), सुनिल नरहरी थोरात (स्विकृत), राजेंद्र नानासाहेब रोहमारे (सदस्य, ओमप्रकाशजी गुलाटी ट्रस्ट) वरील सर्व पदाधिकारी कार्यक्रमाचे निमंत्रक आहे तसेच तज्ञ मार्गदर्शक अरूण नानासाहेब गव्हाणे, आप्पासाहेब नवनाथ नवले, जितेंद्र चंद्रकांत गंगवाल, नितीनजी दादासाहेब दवंगे, ओमप्रकाश शिवदास डागा, संजयजी बाबुराव वाकचौरे, प्रमोद सदाशिव शिंदे,  अविनाश भाऊसाहेब जाधव हे तज्ञ मार्गदर्शक आहेत आयोजित केलेल्या कार्यक्रमास नागरिकांनी, सभासद, पदाधिकारी सर्व मित्र परिवाराने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोपरगांव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी यांच्यासह सर्व असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केले आहे.
ल

कार्यक्रमाची रूपरेषा

सकाळी ०९ वा. रजि‌. व नाष्टा (कलश मंगल कार्यालय)

सकाळी १० वा. उद्घाटन सोहळा (केमिस्ट भवन)

सकाळी ११ वा. सत्कार-मार्गदर्शन औषध व गुड तुला मा.आ. आप्पासाहेब शिंदे अभिष्टचिंतन सोहळा

दुपारी ०१ वा. स्नेह भोजन दुपारी ०३ वा. समारोप

ठिकाण उद्घाटन समारंभ


रविवार २ फेब्रुवारी २०२५ वेळ सकाळी १० वाजता.

“कोपरगांव केमिस्ट भवन” साईसृष्टी, शिव अॅटो सर्व्हिस स्टेशन जवळ, येवला रोड, कोपरगांव.
सत्कार-मार्गदर्शन- औषध व गुड तुला 
मा.आ. आप्पासाहेब शिंदे अभिष्टचिंतन सोहळा
 कलश मंगल कार्यालय, कोपरगांव
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!