किरण जाधव व प्रेरणा मैंद यांच्या यशाबद्दल श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने सत्कार
कोपरगाव प्रतिनिधी – सौ.सुनिताताई नवनाथ पाचोरे (संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन कोपरगाव महिला तालुकाध्यक्ष) व श्री.नवनाथ काशीनाथ पाचोरे यांची भाची कु.किरण साहेबराव जाधव हीने नामदेवराव परजणे पाटील (NPP) काॅलेज संवत्सर बारावी कला शाखा मध्ये ७३.३३ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल व कु.प्रेरना चांगदेव मैंद हीने ६१.८३ टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल दोघींचा श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या वतिने शाल,श्रीफल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कार करताना श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्हाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.मुकुंद मामा काळे व सौ.छायाताई मुकुंदमामा काळे यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दील्या. यावेळी अशोक माळवदे,संतोष रांधव, डाॅ.श्री.मनोज भुजबळ, योगेश ससाणे, संदीप डोखे, अनंत वाकचौरे, अमोल माळवदे, शेखर बोरावके, मनोज चोपडे, ओकांर वढणे आदीनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दील्या.