काळे गटाचे सचिन क्षीरसागर यांची कारवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड
कोपरगाव प्रतिनिधी – नुकतेच १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहिल्या जोरदार मुसंडी मारून अनेक ग्रामपंचायतीची सत्ता मिळविलेल्या काळे गटाचा उपसरपंच पदाच्या निवडणुकीत देखील बोलबाला दिसून आला असून दुसऱ्या टप्यात पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या कारवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे सचिन वसंतराव क्षीरसागर यांची बिनविरोध निवडून आले असुन सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव मतदार संघातील पार पडलेल्या १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे गटाने आपली विजयी परंपरा कायम ठेवत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्यातील उपसरपंचांच्या निवडी मध्ये अनेक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून दुसऱ्या टप्प्यात देखील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणारी कारवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे सचिन क्षीरसागर विराजमान झाले आहे त्यामुळे सरपंचपदाबरोबरच ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत देखील काळे गटाचा बोलबाला दिसून आला.
आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाना सोबत घेवून गावचा विकास करू.ज्या विश्वासाने आम्हाला संधी दिली त्या संधीचे सोने करून येणाऱ्या सर्व निवडणुकीत काळे गटाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी व विधानसभा निवडणुकीत जास्तीत मते आ. आशुतोष काळे यांना विकासाच्या माध्यमातून मिळवून देवू अशी ग्वाही नवनिर्वाचित उपसरपंच सचिन क्षीरसागर यांनी दिली आहे.
कारवाडी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून मंगेश भानुदास लोहकरे, सचिन वसंतराव क्षीरसागर उपसरपंच, गणेश बाळासाहेब शिलेदार सदस्य, योगेश अशोक मोरे सदस्य, केदारनाथ एकनाथ तनपुरे सदस्य, रुपाली निलेश फटांगरे सदस्य, स्वाती सचिन गायखे सदस्य, प्रतिभा जनार्धन मोरे सदस्य, सुरेखा अनिल खरे सदस्य, शालन नंदकिशोर मोरे सदस्य हे सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच , सदस्य ग्रामपंचायतीचे कामकाज पाहणार आहे. नवनिर्वाचित उपसरपंच सचिन क्षीरसागर यांचे माजी आमदार अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे यांच्यासह अनिलबापू बनकर, सुधाकर आण्णा दंडवते, ग्रामसेवक भिसे साहेब, रोमेश बोरावके, रविंद्र फटांगरे, सुमित ताम्हाणे, भारत कोकाटे, नारायण कोकाटे, भूषण जोशी, जनार्धन मोहिते, साईबाबा कोकाटे, राजेंद्र फटांगरे यांच्यासह सचिन क्षीरसागर मित्र परिवारासह समस्त ग्रामस्थांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.