आपला जिल्हानाशिकमहाराष्ट्र

ऑफलाईन पद्धतीने माहे जुलै व ऑगस्टच्या धान्य वितरणास मान्यता

मनिष जाधव 9823752964

ऑफलाईन पद्धतीने माहे जुलै व ऑगस्टच्या धान्य वितरणास मान्यता

मुंबई, दि. १४:  राज्यात ई – पॉस मशिनच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप केले जाते. गेल्या काही दिवसांपासून ई – पॉस मशिनबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यातील पात्र लाभार्थी अन्न धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट मधील अन्नधान्य वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता दिली आहे.

मशिन

ई-पॉस मशीनमध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. यासाठी रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसवण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत.  या तांत्रिक समस्या एनआयसीकडील धान्य वितरण प्रणाली, क्लाऊड सर्व्हर यांच्याशी संबधित आहेत. या समस्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना एनआयसी व क्लाऊड सर्व्हर सुविधा पुरवठादारांना शासनाकडून देण्यात आल्या आहे.

ई-पॉस मशीनमध्ये आलेल्या अडचणींमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना अन्नधान्याचा सुयोग्य पुरवठा व्हावा, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्यांकरिता अन्नधान्याचे वितरण ऑफलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिल्या आहेत.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× आपणांस काय सहकार्य करू