आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर सेवक बेमुदत संपावर

संपादक मनिष जाधव 9823752964

एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे सर्व शिक्षकेतर सेवक बेमुदत संपावर

कोपरगांव मनिष जाधव – रयत शिक्षण संस्थेचे एस .एस .जी .एम. महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठिय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती यांच्या मार्गदर्शनाने व महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ यांच्या निर्देशानुसार एस. एस. जी .एम. महाविद्यालयातील स्थानिक संघटना दिनांक 20 फेब्रुवारी 2020 पासून बेमुदत संपावर गेल्याची  माहिती कार्यालयीन अधीक्षक श्री सुनील गोसावी यांनी दिली.

एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे शिक्षकेतर सेवक बेमुदत संपावर शिक्षकेतर सेवक बेमुदत संपावर

महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही तरी आम्ही २ फेब्रुवारी २०२३ पासून विद्यापीठ परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे व हा संप  पुढे चालू ठेवत आहोत १५ फेब्रुवारी २०२३ रोजी आम्ही महाविद्यालय प्रवेशद्वारासमोर निदर्शने करून लाक्षणिक संप १६ फेब्रूवारी ला सरकारचे लक्ष वेधले होते  परंतु सरकारने अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही म्हणून दि. २०फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संपावर जाण्याचे ठरवले आहे .  पुढील मागण्यासाठी हा संप आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत .कार्यालयीन सेवकांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना कायम ठेवणे, १ जानेवारी २०१६पासून सातवा वेतन आयोग निश्चिती करणे व महाविद्यालयीन रिक्त जागा भरण्यास सरकारने परवानगी देणे, २००५ नंतरची जुनी पेन्शन योजना सेवेत रजू असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू करून कालबाह्य पदोन्नती १०-२०-३० अशी चालू करणे यासारख्या मागण्या घोषणा देत सेवकांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले .या संपामध्ये एस. एस. जी. एम .महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री सुनील गोसावी, श्री साळवे बी. एस.जी. सागर कांबळे श्री .सतीश जाधव ,श्रीमती जानराव आर.ए.श्री. प्रवीण मोकळ श्री.मोरेश बांगर,श्री बाळासाहेब व्यवहारे ,श्री दत्ता तांबे ,श्री संजय कुदळे  श्री सोमनाथ तारडे ,श्री भारत गोरे श्री शिवाजी आरोटे,श्री दिलीप दुशिंग,दीपक हंडोरे,हरिचन्द्र जाधव, श्रीमती वैशाली कदम श्रीमती लता शिंदे आदीसह ५७ कर्मचारी संपामध्ये सहभाग असून या संपाला प्राचार्य, व्यवस्थापन मंडळ व प्राध्यापक संघटना ,विद्यार्थी ,पालक यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तरी शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात व विद्यार्थ्याची होणारी गैर सोय दूर करावी.असे संपकरी सेवकांचे म्हणणे आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!