एम. एस. जी. एस. इंग्लिश मीडियम स्कूलची जानवी अमोल सोनवणे एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत अंदरसुल केंद्रात प्रथम
अंदरसुल प्रतिनिधी सचिन सोनवणे – अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मार्च 2023 मध्ये झालेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेतील ५९ विद्यार्थ्यापैकी ४२ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण.अंदरसुल केंद्रात पहिले पाच क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव पुढील प्रमाणे.
प्रथम जानवी अमोल सोनवणे ९३.६०%, द्वितीय स्मिता पृथ्वीराज देशमुख ९३.००%, तृतीय प्रणव तुळशीराम मगर ९२.२०%, चतुर्थ निकिता नानासाहेब खैरनार ९१.४०%, पंचम नूतन दगु पवार ९१.००%.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, मयूर सोनवणे, जीवन गाडे, डॉ.भगिनाथ जाधव, उज्ज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, संगीताताई सोनवणे, इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, ज्यू.कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमी इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.