आशुतोष काळे कलाकरांच्या कलेची कदर करणारे आमदार-अभिनेता सिद्धार्थ जाधव
कोपरगाव मनिष जाधव :- कोपरगावात उच्च दर्जाचे कलाकार आहेत अभिनयाबरोबरच चित्रपट निर्मितीमध्ये देखील पाऊल ठेवले हि संपूर्ण कोपरगावकरांसाठी अभिमानास्पद बाब असून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत कोपरगावचा नावलौकिक वाढविला असल्याचे गौरवोदगार आ. आशुतोष काळे यांनी काढले आहे.
मराठी अभिनेता सिध्दार्थ जाधव व प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘लग्न कल्लोळ’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत असून त्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाच्या प्रीमियर शो प्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते.
आजवर कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिले असून कलाकारांच्या मागणीची दखल घेवून कोपरगाव शहरातील खुले नाट्यगृहाचे काम लवकरच पूर्ण करणार आहे.’लग्न कल्लोळ’ चित्रपटाच्या सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या.
आशुतोष काळे कलेची कदर करणारे आमदार
सेवा कोणतीही असो हि सेवा वैद्यकीय असो, हि सेवा रंगभूमीची असो किंवा जनसेवा असो. ज्यावेळी आपण सेवा स्वीकारतो त्यावेळी त्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतो. त्यामुळे आपली सेवा सोडून दुसऱ्या सेवेसाठी वेळ देणारे क्वचितच असतात. त्यापैकी आ. आशुतोष काळे हे असून जनसेवा करीत असतांना ते कलेची कदर करणारे देखील आहेत.-अभिनेता सिद्धार्थ जाधव.