Uncategorized

आपातकालीन सेवांना अधिक बळकट करण्याची गरज – उत्कर्षा रूपवते.

मनिष जाधव 9823752964

आपातकालीन सेवांना अधिक बळकट करण्याची गरज – उत्कर्षा रूपवते

कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव- चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेची ‘सुमोटो’ दखला घेत राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते यांनी आज कोपरगाव तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयामध्ये बैठक घेत, झालेल्या कार्यवाहीबद्दलचा आढावा घेतला. याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी व वाहन चालकावर निलंबनाची कार्यवाही करत सदोष मनुष्यबळ गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

द

गाव पातळीवर कार्यरत प्रत्येक यंत्रणेने सतर्कतेने व संवेदनशीलतेने काम करण्याची गरज आहे; असं यापुढे तालुक्यामध्ये निष्काळजीपणापाई एकही जीव जाऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करत आपल्या सेवेत रुजू असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला – कर्मचाऱ्याला सुचना देण्याची गरज आहे असे उत्कर्ष रूपवते यांनी नमूद केले.

आ

चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी भेट देऊन नव्याने रुजू झालेल्या वैद्यकीय अधिकारी, केंद्राचा सर्व स्टाफ व आशा सेविकांशी संवाद साधला. त्यानंतर मयत झालेल्या महिलेच्या कारवाडी येथील घरी भेट देऊन परिवाराची विचारपूस केली. मयत गांगुर्डे यांच्या बाळाला योग्य त्या सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाला सूचना त्यांनी केल्या आहेत.

यावेळी कोपरगावचे तहसीलदार श्री.संदीप कुमार भोसले, गट विकास अधिकारी श्री. सचिन सूर्यवंशी, बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री.पंडित वाघेरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी श्री.अभिराज सूर्यवंशी , तालुका आरोग्य अधिकारी श्री.व्ही.बी घोलप, तालुका संरक्षण अधिकारी श्री.विकास बागुल, केस वर्कर वन स्टॉप सेंटर अहमदनगर श्रीमती ममिता पावरा, समुपेदशक श्री.नितीन थोरात, समुपदेशक श्रीमती वैशाली झालटे इत. उपथिस्त होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!

×

Hello!

Click one of our contacts below to chat on WhatsApp

× आपणांस काय सहकार्य करू