Uncategorized

“आण्णा” व्यक्ती नसून एक ‘विद्यापीठच

संपादक मनिष जाधव 9823752964

क

“आण्णा” व्यक्ती नसून एक ‘विद्यापीठच

शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे जयंती निमित्त- भव्य जेष्ठ नागरीक सन्मान सोहळा संपन्न

मनिष जाधव कोपरगांव -कोपरगाव तालुकयातील शैक्षणीक क्रांतीचे जनक शिक्षणमहर्षो ग.वि. तथा लहानुभाऊ नागरे यांच्या ८५ व्या जयंती निमित्त रेनबो इंटरनॅशनल स्कूल येथे दि. ०१ मार्च २०२३ रोजी जेऊर कुंभारी आणि पंचकोशीतील सत्तरी पार केलेल्या जेष्ठ नागरीकांचा सन्मान सोहळा थाटात पार पडला. शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठाण, रेनबो इंटरनॅशनल स्कूल आणि संत जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. लहानुभाऊ नागरे यांच्या ८५ व्या जयंती निमित्ताने परीसरातील जेष्ठ नागरीकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

क

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोपरगाव नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. पद्माकांतजी कुदळे, रेनबो इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष उद्योजक मा. श्री. कांतीलालजी अग्रवाल, विश्वस्त संजयजी नागरे, आनंदजी दगडे यांच्या हस्ते जेष्ठ नागरीकांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन त्यांचा सन्माण करण्यात आला. विद्यमान कार्यकारी विश्वस्त आकाशजी नागरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सर्व मान्यवर, जेष्ठ नागरीक, विद्यार्थी-शिक्षक वृंद यांनी आण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना दिली. आण्णा व्यक्ती नसून एक ‘विद्यापीठच’ होते. त्यांच्या सहवासातील स्मृतींना उजाळा देत श्री. आकाशजी नागरे यांच्या कल्पनेतील उपक्रमाचे कौतूक केले. या प्रसंगी संत जानर्दन स्वामी हॉस्पीटलच्या वतीने विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी यांची आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. श्री. आकाश नागरे यांनी जेष्ठ नागरीक. एस. जी. एस चे आरोग्य अधिकारी यांचे आभार व्यक्त करून अण्णांच्या नावे दिलेली शिष्यवृती आणि जिवन गौरव पुरस्काराची घोषणा केली.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!