“आट्यापाट्या स्पर्धा” भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे संपन्न
संगमनेर प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर व जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर ,तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय संगमनेर व भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालय व जुनिअर कॉलेज संगमनेर आयोजित जिल्हास्तरीय शालेय 14/17/ 19 वर्षे वयोगट मुले व मुली आट्यापाट्या स्पर्धा आज शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे संपन्न झाल्या.
17 वर्ष मुले व 19 वर्ष मुले व मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाने तीनही संघाने घवघवीत यश संपादन करून पुणे विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य ,उपप्राचार्य क्रीडा मार्गदर्शक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद सर्वांच्या वतीने विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐👌👌👍👍