पुणे

आज पुण्यात सहकारी पतसंस्थेसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा

मनिष जाधव 9823752964

आज पुण्यात सहकारी पतसंस्थेसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा

पुणे प्रतिनिधी जनसंजीवनी वृत्तसेवा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे शहर) व जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) आणि पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्थांसाठी बुधवारी (दि.14) एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (शहर) नारायण आघाव यांनी दिली. सहकार आयुक्तायलय आणि सहकारी संस्थांचे पुणे विभागीय सहनिबंधक यांच्या सूचनेनुसार ही कार्यशाळा होत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी दहा वाजता कार्यशाळेस सुरुवात होईल.

कार्यशाळेतील विविध विषयांमध्ये प्रामुख्याने पतसंस्थांना नव्याने लागू झालेले कलम 144-अ ते 144-वाय यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले हे मार्गदर्शन करतील. पतसंस्था संदर्भातील आर्थिक साक्षरता या विषयावर पुणे विभागाचे विशेष लेखापरिक्षक वर्ग-1 बाळासाहेब बडाख तर थकबाकी वसुलीमधील कायदेशीर बाबींवर सहकार विभागाचे उपनिबंधक व पुणे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड हे मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेत पुणे विभागीय सह निबंधक डॉ. संजयकुमार भोसले आणि राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे हे सुध्दा उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष विनायकराव तांबे, मानद सचिव शामराव हुलावळे, संचालक यतीनकुमार हुले आदींसह अन्य संचालक उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यशाळेस जिल्ह्यातील सहकार विभागाचे प्रशासन,लेखापरीक्षणचे अधिकारी, कर्मचारी, नागरी व ग्रामीण तसेच कर्मचारी पतसंस्थांच्या पदाधिकारी, वसुली अधिकारी, प्रमाणित लेखा परीक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आघाव यांनी केले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!