अहिल्यानगर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १३ ऑक्टोबरला
अहिल्यानगर, दि. ९ : जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सोडत कार्यक्रम सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला आरक्षणासह) व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पंचायत समिती गणाकरिता संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे प्राधिकृत अधिकारी असतील. तसेच प्रत्येक पंचायत समितीतील सोडतीच्या कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० वाजता पंचायत समिती क्षेत्रांच्या आरक्षण सोडतीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या जागांसाठी मुख्य सोडत कार्यक्रम नेहरू सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०० वाजता पार पडणार आहे.
तालुकानिहाय सोडतीची ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत :
अकोले – तहसिल कार्यालय, अकोले;
संगमनेर – यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारत, प्रांत कार्यालय, संगमनेर;
कोपरगाव – तहसिल कार्यालय (दुसरा मजला), कोपरगाव;
राहाता – तहसिल कार्यालय, राहाता ;
श्रीरामपूर – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय, श्रीरामपूर;
राहुरी – तहसिल कार्यालय, राहुरी ;
नेवासा – तहसिल कार्यालय, नेवासा ;
अहिल्यानगर – नियोजन भवन, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर;
पारनेर – तहसिल कार्यालय, पारनेर ;
पाथर्डी – तहसिल कार्यालय, पाथर्डी ;
शेवगाव – तहसिल कार्यालय, शेवगाव ;
कर्जत – तहसिल कार्यालय, कर्जत ;
श्रीगोंदा – तहसिल कार्यालय, श्रीगोंदा;
जामखेड – तहसिल कार्यालय, जामखेड.
संबंधित तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आरक्षण सोडतीची कार्यवाही पार पाडून त्याचा अहवाल त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे अपेक्षित आहे.
जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रातील सोडत कार्यक्रमास इच्छुक नागरिकांनी संबंधित ठिकाणी व वेळेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.