अकोले,संगमनेर तालुक्यातून सदिच्छा,बहूजन आघाडीला मोठा पाठींबा – राजेंद्र शिंदे
अहमदनगर प्रतिनिधी – अकोले, संगमनेर तालुक्यातून सदिच्छा, बहूजन,शिक्षक संघ,साजिर महिला मंडळ आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान होणार असुन, विजयाचा मार्ग या दोन तालुक्यातुन सदिच्छा आघाडीला प्राप्त होणार असल्याची माहीती सदिच्छा आघाडीचे प्रमुख राजेंद्र शिंदे यांनी दिली.

अकोले तालुक्याच्या प्रचार दौर्यावर असतांना तालुक्यातील सुमारे 25 मोठ्या शाळांना व शिक्षक बांधवांना त्यांनी भेटी दिल्या!समवेत भागवत लेंडे,सुभाष बनगर,अशोक पथवे,सतिष डावरे,नवनाथ तोडमल,अशोक देशमुख,रविंद्र रुपवते,युवराज तळपे,जगदीश झाडे,चंद्रभान मेंगाळ,बाळु डगळे,देवराम बांडे,धोंडु मुंडे,काळु तपासे,भाऊसाहेब तोरमल,राजश्री जगताप,सुनिता जगताप,जया कोळपे,रमाकांत बागडे,व इतर शिक्षक बांधव होते.संगमनेर व अकोले तालुक्यातील 70% सभासद सदिच्छा बहुजन आघाडीला मतदान करणार असुन मुळ अकोले तालुक्याचे असणारे पण इतर तालुक्यात सेवेत असणार्या सर्व शिक्षकांनी सदिच्छा आघाडीला मतदान करावे असे आवाहन भागवत लेंडे व सुभाष बनगर यांनी केले.
सुई घ्यायची तरी आमसभा घेऊ अशा गर्जना करणार्यांनी सूरक्षारक्षक घोटाळा,राहुरी चोरी,नोटा मोजण्याचे मशीन घोटाळा,साॅफ्टवेअर घोटाळा,श्रीगोंदा स्ट्राँगरुम दरवाजा,नेवासा पाथर्डी शाखा दुरुस्ती घोटाळा,शताब्दी घोटाळा,घड्याळ घोटाळा,सावित्री लेकी पूरस्कार घोटाळा,चेअरमन निवडी घोटाळा यासह 100घोटाळे करणारे मुळ गूरुमाऊली व तोतया गुरुमाऊली यांना सभासद अजिबातच थारा देणार नाही,स्टँम्पवर लिहुन देणार्यांनी शब्द पाळला नाही पुढे काय करणार?. पैशाच्या जोरावर कितीही खोगीर भरती करुन घेतली तरी गूरुमाऊलीचे पानिपतच होणार! गुरुकूल बाबतीत बोलण्याची गरजच राहीली नाही!असे प्रतीपादन राजेंद्र शिंदे यांनी केले! विकास मंडळाची भग्न इमारत सर्व सभासद व सर्व विरोधी संघटनांना विश्वासात घेऊन सदिच्छा,बहुजन ,शिक्षक संघ,साजिर महिला आघाडी बांधणार आहे!असे सुभाष बनगर यांनी सांगीतले!