Uncategorized

शिर्डी विमानतळाच्या सर्वांगिण विकासासाठी ८७६ कोटी निधीस नवीन प्रशासकीय मान्यता

शिर्डी विमानतळाच्या सर्वांगिण विकासासाठी ८७६ कोटी निधीस नवीन प्रशासकीय मान्यता

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील काकडी येथील श्री साईबाबा शिर्डी विमानतळाच्या संपूर्ण विकासासाठी अधिकचा निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाने शिर्डी विमानतळाच्या सर्वांगीन विकासासाठी ८७६ कोटी निधीस नवीन प्रशासकीय मान्यता दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

चआआ

देशातील धार्मिक देवस्थानामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या देश विदेशातील असंख्य साईभक्तांना श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून विमान तळ विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी२०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महायुती शासनाने प्रवासी टर्मिनलसाठी ५२७ कोटी निधी मंजूर करून त्याबाबतच्या कामाची निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु शिर्डी विमानतळाचा संपूर्ण विकास होण्यासाठी अधिक निधी मिळावा यासाठी आ. आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून शिर्डी विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी उर्वरीत कामांकरीता ८७६.२५ कोटी निधीस सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये लॅण्डस्केपिंग व सुशोभिकरण, प्रवेशद्वार, विभक्त भिंत, अग्निशामक केंद्रासाठी पाण्याची भूमिगत टाकी आणि क्रॅश गेट्सचे बांधकाम करणे, दोन अतिउच्च दाबाच्या विद्युवाहिन्यांचे वळतीकरण करणे, धावपट्टीचे रीकार्पेटींग व संलग्न कामे, विमानतळामधील पाणी वितरण व सांडपाणी वाहून नेणारी सिस्टिम तसेच पाणी प्रक्रिया केंद्र, सीआयएसएफ कर्मचारी वसाहत, कार्गो कॉम्प्लेक्स, हवाई वाहतूक प्रशिक्षण संस्था इ. साठी आवश्यक असणाऱ्या  प्रस्तावित १२७ हे. जागेचे भूसंपादन करणे आदी कामांसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.

W

महायुती शासनाने जगभरातून येणाऱ्या शिर्डीला साई भक्तांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी शिर्डी विमानतळाच्या उर्वरित विकास कामांना प्राधान्य देवून ८७६.२५ कोटी निधीस सुधारीत प्रशासकीय मान्यता दिली त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!