आपला जिल्हामहाराष्ट्र

शिर्डी पोलीसांनी साईभक्ताचे गहाळ झालेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अवघ्या दोन तासामध्ये लावला तपास

संपादक मनिष जाधव 9823752964

शिर्डी पोलीसांनी साईभक्ताचे गहाळ झालेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अवघ्या दोन तासामध्ये लावला तपास

शिर्डी राहुल फुंदे प्रतिनिधी – दिनांक 30 आॅगस्ट 2024 रोजी श्री अडबाला विरा वेंकटा रा. आंध्रप्रदेश हे त्यांचे पत्नीसह श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आलेले होते. दर्शनकरून ते दिनांक 31/08/2024 रोजी खाजगी स्विफ्ट डिझायर गाडीने काकडी विमानतळाकडे गेले असता विमानामध्ये बसल्यानंतर 2,70,000 रूपये किमतीचे सोन्याचे दागिने व ए.टी.एम. कार्ड असलेले पर्स हे सदर स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये विसरून गेल्याचे त्यांचे लक्षात आले. परंतु सदर गाडीचे मालक, गाडी नंबर/मोबाईल नंबर नसल्यामुळे ते पुर्णपणे गोंधळुन गेले होते.

अ

ते दिनांक 01/09/2024 रोजी पुन्हा शिर्डी पोलीस स्टेशनला येवुन सदर घटनेबाबत पोलीसांना माहिती कळविल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी श्री शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार यांनी सुचना देवुन तात्काळ तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भारत बलैय्या, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद गोरे यांचे पथक नेमले व त्यांनी काकडी विमानतळावरून व अन्य ठिकाणीवरून सदर गाडीचे सी.सी.टि.व्ही. फुटेजद्वारे गाडीचा नंबर प्राप्त करून सदर गाडीचालकाचा शोध घेतला. सदर गाडीचालकास शिर्डी पोलीस स्टेशन येथे बोलावुन त्यास घटने बाबत विचारपुस केली परंतु पर्स गाडीमध्ये राहीलेबाबत त्यांना काहीएक माहिती नसल्याचे सांगितल्याने त्यांचे गाडीमध्ये पर्सचा शोध घेतला असता ती सीटच्या खाली पडलेली मिळुन आली. सदरचे दागिने असलेली पर्स ही तात्काळ महिला तक्रारदार यांचे ताब्यात देण्यात आले. त्यावेळी सदर साईभक्त यांनी शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानले

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!