मध्य रेल्वेचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक पदाचा निरज कुमार दोहरे यांनी पदभार स्वीकारला
पुणे प्रतिनिधी –
श्री निरज कुमार दोहरे यांनी नुकतेच मध्य रेल्वे, मुंबई येथे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (एसडीजीएम ) म्हणून पदभार स्वीकारला आहे. ते १९९१ च्या बॅचचे इंडियन रेल्वे स्टोर्स सर्विस (आईआरएसएस) अधिकारी आहेत. श्री निरज कुमार दोहरे यांनी १९९१ मध्ये कानपूर येथील हार्कोर्ट बटलर टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले आणि दि. ३० नोव्हेंबर १९९२ रोजी भारतीय रेल्वेमध्ये रुजू झाले.

एसडीजीएम म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, त्यांनी २०२२ ते २०२५ पर्यंत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले.
श्री दोहरे यांनी २०१७-१८ मध्ये नवी दिल्लीतील भारतीय सार्वजनिक प्रशासन संस्था (आईआईपीए) येथून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदविका पूर्ण केली आणि त्यांना साहित्य खरेदी, भंगार विक्री आणि स्टोअर्स डेपो व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे.
भारतीय रेल्वेमध्ये त्यांच्या प्रतिष्ठित कारकिर्दीत, श्री निरज कुमार दोहरे यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी २०१९ ते २०२२ पर्यंत मध्य रेल्वेमध्ये मुख्य साहित्य व्यवस्थापक म्हणून काम केले आणि २०१८ ते २०१९ पर्यंत कोंकण रेल्वे महामंडळामध्ये त्याच पदावर होते. २०१५ ते २०१७ पर्यंत ते नवी दिल्लीतील रेल्वे बोर्डात रेल्वे स्टोअर्स इन्व्हेंटरी कंट्रोलचे संचालक होते. त्यांनी २००३ ते २०१४ पर्यंत पश्चिम रेल्वेमध्ये उपमुख्य भांडार व्यवस्थापक, १९९७ ते २००१ पर्यंत पूर्वोत्तर रेल्वे मध्ये दक्षता अधिकारी (स्टोअर्स) आणि १९९४ ते १९९६ पर्यंत दक्षिण पश्चिम रेल्वे (पूर्वी दक्षिण रेल्वे) येथील कृष्णराजपुरम डिझेल शेडमध्ये सहाय्यक भांडार नियंत्रक म्हणून काम केले आहे. साहित्य व्यवस्थापन आणि सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या समृद्ध अनुभवामुळे, श्री दोहरे हे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक म्हणून त्यांच्या नवीन पदावर मध्य रेल्वेची कार्यक्षमता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.