बिनविरोधास हरकत नाही, पण काँग्रेसला विश्वासात न घेतल्यास निवडणूक निश्चित – आकाश नागरे
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव बाजार समिती प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत यासाठी सर्वांचे विशेष प्रयत्न आहे. सध्या बाजार समितीची निवडणूक सुरू आहे बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसकडून सर्वांत पहिले सहमती दिली परंतु शेवटच्या टप्प्यात आम्हालाच बाजुला ठेवून निवडणुक बिनविरोध करणार असेल हे शक्य होवु देणार नाही वेळ आली तर आम्ही निवडणुकीला देखील सामोरे जावु असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांनी दिला आहे.
शेतक-यांबरोबरच सहकारी संस्था टिकल्या पाहिजे त्यातून सर्वांचा उत्कर्ष, विकास झाला पाहिजे ही भावना या तालुक्याचे नेत्यांनी पुढाकार घेतला तीच भूमिका काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांची देखील आहेत. बाजार समिती ही शेतक-यांची संस्था असुन ती टिकली पाहिजे, त्यात कुठेही राजकारण येता कामा नये, त्यातुन शेतक-यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न व्हावेत याच उददेशांने तालुक्याचे नेत्यांनी देखील मनात शंका न ठेवता काँग्रेसला देखील विश्वासात घ्यावे. निवडणुकीची वेळ येणार नाही याचा देखील तालुक्याचे नेते व इतर जवाबदार व्यक्तींनी देखील यावर विचार करावा जर कदाचित निवडणुक झाल्यास नक्कीच बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व राहणार हे देखील सत्य असल्याचे आकाश नागरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.