आपला जिल्हा

पोहेगावात गुंडाकडून एकास जबर मारहाण.. आंबेडकरनगर परिसरात दहशत…

मनिष जाधव 9823752964

पोहेगावात गुंडाकडून एकास जबर मारहाण.. आंबेडकरनगर परिसरात दहशत…

पोलीस निरीक्षक कुंभार यांचे आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन

कोपरगाव (वार्ताहर)कोपरगाव तालुक्यातील पोहेगांव मध्ये बुधवारी सहा जून रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास मोटार सायकल वरून आलेल्या गुंडांकडून सागर दिनकर भालेराव या युवकास जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सागर भालेराव जखमी झाला असून त्याच्यावर शिर्डी येथे साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे.

अ
बुधवारी दुपारी सागर भालेराव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ बसलेले असताना आरोपी शरद गोटीराम फुलारे , नवनाथ गोर्डे उर्फ भावड्या व इतर दहा ते पंधरा गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सागर भालेराव वर प्राणघातक हल्ला केला.सदर घटनेची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीनराव औताडे यांना नागरिकांनी दिली. आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी पोहेगांव ग्रामपंचायतीत आंबेडकर नगर परिसरातील महिला व पुरुष दाखल झाले. दोनशे तीनशे चा लावा जमा घेऊन ते शिर्डी पोलीस स्टेशन गाठणार होते. यासंदर्भात नितीनराव औताडे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहीती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक कुंभार यांनी पोहेगांवात दाखल झाले.दहशती खाली असलेल्या नागरिकांनी आरोपींनी हॉकी स्टिक ,शॉकअप ,लाकडी दांडे अदी वस्तूंचा वापर करत संपूर्ण परिसरात दहशत पसरली असून आम्हाला संरक्षण द्या अशी मागणी केली. सागर भालेराव यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर तडीपरीची मागणी केली.नितीनराव औताडे यांनी नागरिकांना शांत करत पोलीस निरीक्षक कुंभार हे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी अनेक गुन्हेगारावर कारवाई केली असल्याचे सांगितले. ते निश्चित न्याय देतील व आरोपीवर कारवाई करतील. पोहेगाव मध्ये आऊट पोस्ट असल्याने पोलीस पाटील पद रद्द झालेले आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पोलीस पाटील म्हणून आमचे गावात मिरवू नका, तसेच शिर्डी पोलीस स्टेशन ने सिक्युरिटी म्हणून तात्काळ आऊट पोस्ट सुरू करावे अशी मागणी देखील त्यांनी केली.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पावले
उचलली जातील.

Adds

आंबेडकर नगर व पोहेगाव परिसरात दर दोन तासाला शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलिंग साठी पोलीस स्टेशनची गाडी पाठवण्यात येईल. फिर्यादीचे जबाब घेऊन आरोपीवर योग्य कलम लावले जातील असे आश्वासन देत त्यांनी नागरिकांना धीर दिला. ग्रामपंचायत पोहेगावच्या वतीने सरपंच अमोल औताडे यांनी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 
Back to top button
Don`t copy text!