Uncategorized

कोकमठाण सोसायटीच्या अध्यक्षपदी काळे गटाचे आप्पासाहेब लोहकने तर उपाध्यक्षपदी पदी कोल्हे गटाचे कालिदास धीवर यांची निवड

मनिष जाधव 9823752964

कोकमठाण सोसायटीच्या अध्यक्षपदी काळे गटाचे आप्पासाहेब लोहकने तर उपाध्यक्षपदी पदी कोल्हे गटाचे कालिदास धीवर यांची निवड

कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी काळे गटाचे आप्पासाहेब लोहकने यांची तर उपाध्यक्षपदी पदी कोल्हे गटाचे कालिदास धीवर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

कोकमठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष दगूनाथ तात्याबा गायकवाड व उपाध्यक्ष विलास जगन्नाथ आव्हाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नेरे यांच्या उपस्थितीत नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी अध्यक्षपदासाठी आप्पासाहेब लोहकने तर उपाध्यक्षपदासाठी कालिदास धीवर यांचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आल्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात येवून अध्यक्षपदी आप्पासाहेब लोहकने तर उपाध्यक्षपदी पदी कालिदास धीवर यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी  नेरे यांनी जाहीर केले. यावेळी कोकमठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष आप्पासाहेब लोहकने व उपाध्यक्ष कालिदास धीवर तसेच मावळते अध्यक्ष दगूनाथ तात्याबा गायकवाड व उपाध्यक्ष विलास जगन्नाथ आव्हाड यांचा समस्त संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

औ

या निवडी प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम,गौतम सहकारी बँकेचे संचालक विजयराव रक्ताटेजिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक महेश लोंढेशरदनाना थोरात,सचिव रविंद्र दातीर तसेच कोकमठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटी सर्व संचालक मंडळ, सभासद यावेळी मोठ्या संखेत उपस्थित होते.

मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!