कुशाल्स फॅशन आणि सिल्व्हर ज्वेलरी तसेच अभिनेत्री ह्रुतादुर्गुळे यांच्यासोबत गणेश चतुर्थी साजरी करा सणासुदीच्या काळासाठी खास आकर्षक अँटिक संग्रह
पुणे, ऑगस्ट २०२५ : गणेशोत्सव जवळ येत असताना, कुशाल्स फॅशन आणि सिल्व्हर ज्वेलरीने भारतीय कारागिरी आणि आधुनिक आकृत्या यांचा सुंदर संगम साधणारी खास अँटिक फिनिश दागिन्यांची उत्सवी संग्रहिका सादर केली आहे । ही संग्रहिका भक्तिभावाचा उत्सव साजरा करताना आजच्या स्त्रीसाठी बहुपयोगी आणि स्टाइलिश दागिन्यांचा पर्याय देते ।
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांत प्रिय सणांपैकी एक असून, तो रंग, संगीत, विधी आणि एकोप्याने भरलेला असतो। कुटुंबे मोठ्या उत्साहाने बाप्पांना घरी आणतात, आणि सणाचा लूक पूर्ण करण्यासाठी दागिन्यांची महत्त्वाची भूमिका असते। कुशाल्सचा नवाकोरा संग्रह या परंपरांना मान देत कुशल हातांनी घडवलेल्या आकृत्या आणि नाजूक कारागिरीद्वारे सादर केला आहे, जो परंपरेला साजेसा असूनही सहजपणे आधुनिक वॉर्डरोबमध्ये मिसळतो। हा संग्रह बाप्पांचे आगमन असो किंवा विसर्जन, दोन्ही प्रसंगांसाठी उत्तम आहे प्रीमियम स्पर्शाचा अनुभव आणि हलक्या वजनाचा आराम देत संपूर्ण उत्सवभर सहजतेची हमी देतो

अभिनेत्री ह्रुता दुर्गुळे, जी या मोहिमेचे मुखपात्र आहे, ती परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम मोहकपणे सादर करते मोहिमेच्या दृश्यमालिकेत ह्रुता पारंपरिक ‘चंद्रकोर’ डिझाइन, जे महाराष्ट्राचे जपलेले प्रतीक आहे, आणि नाजूक आधुनिक फुलांच्या नक्षीचा संगम असलेला स्टेटमेंट चोकर परिधान करते। अँटिक फिनिशमुळे या चोकरला राजेशाही आकर्षण लाभते, जे सणासुदीच्या काळासाठी अत्यंत योग्य आहे। हा लूक ती समृद्ध हिरवे आणि माणिक-लाल रंगातील दगडांनी सजवलेल्या कड्यांसह, ड्रॉप झुमके, सूक्ष्म गणेश आकृत्यांनी सजवलेल्या स्टेटमेंट फिंगर रिंग्जने पूर्ण करते। प्रत्येक दागिना दागिन्यांच्या कलात्मकतेचे दर्शन घडवतो आणि एकाच वेळी आधुनिक स्टायलिंगसाठी ताजा व सुसंगत भासतो।
*लॉन्चबाबत बोलताना, कुशाल्स फॅशन ज्वेलरी चे सह-संस्थापक मनीष गुलच्छा म्हणाले:* “पुणे हा आमच्यासाठी एक रणनीतीमूलक बाजार आहे आणि येथे आम्हाला मिळालेल्या उबदार व उत्साही प्रतिसादामुळे आम्ही अत्यंत आनंदित आहोत। सणासुदीचा हंगाम जवळ येत असल्याने, आम्ही आमच्या नवीनतम संग्रहिकेची ओळख येथे आपल्या ग्राहकांपर्यंत करून देण्यासाठी उत्साहित आहोत। सूक्ष्म अँटिक फिनिश दागिन्यांपासून स्टेटमेंट फेस्टिव्ह ज्वेलरीपर्यंत, प्रत्येक सणासाठी आम्ही काहीतरी खास ऑफर करतो, ते आमच्या स्टोअर्समध्ये असो किंवा ऑनलाईन। अभिनेत्री ह्रुतादुर्गुळे यांच्यासह होणाऱ्या *सहकार्याबद्दल आम्हाला आनंद आहे, ज्यांचे आकर्षण आणि गोडसर रूप आमच्या संग्रहिकेच्या सारांशाशी उत्तमरीत्या जुळते”* ।

या संग्रहिकेच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन नक्षी समाविष्ट आहेत, जसे की चंद्रकोर आणि फुलांची आकृती—ज्यांचे प्रतीक ज्ञान, समृद्धी आणि सामर्थ्य दर्शवते. या रेंजमध्ये ट्रेंडिंग स्टाइल्सदेखील आहेत, जसे की अलंकारिक चोकर, स्टेटमेंट फिंगर रिंग्ज, आणि ठसठशीत कडे, जे प्रत्येक सणासुदीच्या सोहळ्यात लक्षवेधी ठरतील अशा प्रकारे आकृत्या केलेले आहेत।
अभिनेत्री ह्रुतादुर्गुळे यांनी या सहकार्याबाबत आपले विचार व्यक्त केले: “गणेशोत्सवासाठी हा संग्रह परिधान करताना मला माझ्या मुळाशी आणि या सणाच्या उत्साही वातावरणाशी एक नाते अनुभवायला मिळाले. मला खूप आवडले की कुशाल्सने पारंपरिक नक्षी जसे की चंद्रकोर आणि पैठणीच्या फुलांची आकृती इतक्या ताज्या आणि आधुनिक पद्धतीने सादर केल्या आहेत- हा संग्रह सण साजरा करण्यासाठी आणि सुंदर आठवणी तयार करण्यासाठी अगदी परिपूर्ण आहे।
अँटिक सोन्याच्या रंगात तयार केलेल्या या संग्रहात समृद्धी आणि पारंपरिक अनुभव आहे, जो पूजा, कुटुंबियांसोबत भेटी आणि सणासुदीच्या कार्यक्रमांसाठी अगदी योग्य आहे। हे दागिने रेशीमच्या साड्या, पैठणी, पारंपरिक नौवारी किंवा सुंदर लेहेंग्यासोबत घालून सणाचा लूक छान तयार करता येतो। तसेच, एम्ब्रॉइडर्ड जॅकेट्स आणि फ्लोई स्कर्टसारख्या इंडो-वेस्टर्न कपड्यांसोबत घालून आधुनिक शैली देखील मिळते।
*देशभर उपलब्ध:*
*गणेश चतुर्थी संग्रह आता पुण्यातील सर्व सहा स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे। ग्राहक हे संग्रह* www.kushals.com किंवा कुशाल्सच्या मोबाईल अॅपवरही ऑनलाइन एक्सप्लोर करू शकतात।
या गणेश चतुर्थीला, सणाच्या आधुनिक आनंदासाठी पारंपरिक, नाजूक आणि दैवी दागिन्यांसह साजरा करा – फक्त कुशाल्समध्ये संग्रहिका खरेदी करा* :https://www.kushals.com/collections/ganesha-jewellery-collection