आपला जिल्हामहाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान,घरात पाणी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली भर पावसात नुकसानीची पाहणी 

मनिष जाधव 9823752964

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान,घरात पाणी विवेकभैय्या कोल्हे यांनी केली भर पावसात नुकसानीची पाहणी 

कोपरगाव मतदारसंघात २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावर हाताशी आलेली पिके पाण्याखाली गेली आहेत.अनेक भागातील सोयाबीन,कांदा,कांदा रोपे,मका,कपाशी या सारख्या पिकांचे नुकसान होण्याची परीस्थिती ओढवली आहे.काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.तातडीने प्रशासनाने पावले उचलून पंचनामे करावे अशी मागणी तहसीलदार महेश सावंत यांच्याशी सर्वात आधी संपर्क करून सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.
औ
पाणी साचलेल्या भागात पाहणी करून आवश्यक येथे मदतकार्य करत अनेक ठिकाणी जेसीबी उपलब्ध करून देत पाण्याचा निचरा संजीवनी उद्योग समूहाने केला आहे.तसेच घरात पाणी गेल्याने शेकडो कुटुंबा पर्यंत भोजन पोहचविण्याचे काम संजीवनी समूहाने केले आहे.एखाद्या कुटुंबा प्रमाणे रात्रीपासून संजीवनीचे पथक मैदानात उतरून कार्यरत असल्याने परीस्थिती आटोक्यात येण्यास मदत झाली.
ऊ
काल झालेल्या अतिवृष्टीमुळे जनतेचे अतोनात हाल झाले आहे.अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह जाण्यास जागा नसल्याने जे सी बी आवश्यक होता.विवेकभैय्या कोल्हे यांनी काल रात्री पासून परीस्थिती निवारण्यासाठी आवश्यक तिथे आपली यंत्रणा पाठवली.हेल्पलाईन द्वारे मदतीसाठी येणाऱ्या सूचना आणि मागणी नुसार सकाळी प्रशासनाला पाहणी करून सरकट पंचनामे करण्याची मागणी केली त्यांनी आहे.
भैय्या
जाहिरात
मनिष जाधव

सदरील दैनिक जनसंजीवनी मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहिराती तसेच व्हीडीओ यासांठी मजकुराबद्दल संपादक व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही. जरी काही वाद  उद्भवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहिल. संपादक - मनिष एस. जाधव 9823752964 

Back to top button
Don`t copy text!